पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांचे ७ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. यासह, सोशल मीडियावर फॉलो करण्यात येणाऱ्या भारतीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत. मोदींनंतर मायक्रोब्लॉगिंग साइटवर पोप फ्रान्सिस यांचे ५.३ कोटी फॉलोअर्स आहेत. मात्र पंतप्रधान मोदींच्या आधी हा विक्रम तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर होता, ज्यांचे ट्विटर अकाऊंट आता बंद झाले आहे.

पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ट्विटरशी आहेत. एका वर्षाच्या आतच त्यांना एक लाख फॉलोअर्स मिळाले होते. जुलै २०२० मध्ये पंतप्रधानांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या ६ कोटींवर पोहोचली. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विटरवर २.६३ कोटी फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे १.९४  कोटी फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान मोदी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नेहमीच सक्रिय असतात. प्रत्येक घटनेवर ते पोस्ट करत असतात. गुरुवारी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या धोरणाबद्दल त्यांनी पोस्ट केली आहे.

यासह, पंतप्रधान मोदी जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत.

जगातील दुसरे सर्वात लोकप्रिय नेते

इतर जागतिक नेत्यांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा समावेश आहे ज्यांचे १२.९८ कोटी फॉलोअर्स आहेत, तर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बिडेन यांचे ३.०९ फॉलोअर्स आहेत. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही ट्विटरवर बरेच प्रसिद्ध होते, त्यांचे ८.८७ फॉलोअर्स होते, पण आता त्यांचे अकाऊंट बंद झाले आहे.