सोशल मीडियावर सध्या लिफ्ट चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डॉली पार्टोनने सर्वप्रथम या ट्रेंडला सुरुवात केली. यामध्ये तुम्हाला लिंकडीन, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि टिंडर या ४ सोशल मीडिया प्रोफाईलवरचे फोटो पोस्ट करायचे आहेत. भारतामध्येही या ट्रेंडला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा गोलंदाज इशांत शर्मानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ४ फोटो पोस्ट करत असताना, इशांतने टिंडरवर मात्र लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये इशांतने, माझं टिंडरवर अकाऊंट आहे हे बायकोला समजलं तर ती जीव घेईल माझा…असंही म्हटलंय.

दरम्यान कसोटी संघातला महत्वाचा गोलंदाज असलेल्या इशांत शर्माला सध्या दुखापत झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी इशांतची तब्येत सुधारणं हे भारतीय संघासाठी गरजेचं आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत इशांत भारतीय संघाकडून खेळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.