ठरवलं तर अशक्य काहीच नसतं असं म्हणतात. अमेरिकेतील जेसिका कॉक्सने हेच पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. जनुकीय गुंतागुंतीमुळे जन्मापासूनच हात नसणारी जेसिका ही वैमानिक झाली आहे आणि तिने आपले व्यंग कधीच आपल्या स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही. जेसिकाने अॅरेझॉना विद्यापिठामधून मानसशास्रामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून काही हजार तासांचे यशस्वी उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हात नसतानाही वैमानिकाचा परवाना मिळवणारी ती पहिली व्यक्ती ठरली आहे.

जेसिका ही चक्क पायाने विमान उडवते. केवळ विमान उडवत नाही तर तिने परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. एका कार्यक्रमामध्ये जेसिकाला एक फायटर जेटचे वैमानिक भेटले आणि त्यांनी तिचे हिंमत पाहून तुला वैमानिक व्हायला आवडेल का असे विचारले. तिने लगेच त्याला होकार दिला आणि तिथूनच ही अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रवास सुरु झाला. १० ऑक्टोबर २००८ रोजी तिला प्रशिक्षणसाठी परवाना मिळाला. त्यानंतर तिने प्राथमिक स्तरावरील तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतले.

या तीन वर्षांमध्ये १० हजार फूटांवर हलक्या वजनाचे स्पोर्ट्स विमान उडवण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले. नुकतेच तिने सर्व प्रशिक्षण पूर्ण केले असून हात नसतानाही विमान उड्डाणाचा परवाना मिळवणारी ती पहिली व्यक्ती ठरली आहे.

आपल्या या प्रवासाबद्दल २०१५ साली तिने ‘डिस आर्म युआर लिमीट’ नावाचे आत्मचरित्र लिहिले. जेसिका तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. हात नसले तरी सामान्यांप्रमाणे अनेक गोष्टी ती स्वत:च करते अगदी पियानो वाजवण्यापासून ते स्कुबा डायव्हिंगपर्यंत सर्व गोष्टी जेसिकाला जमतात.

 

View this post on Instagram

 

One question, can I get it without rudder pedals? #osh19 @epic_aircraft

A post shared by Jessica Cox (@rightfooted) on

तिने आणि तिचा पती पॅट्रीकने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये जेसिकाचा दिनक्रम कसा असतो हे दाखण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

#Tucson Meet Yourself wraps up today and I had to stop for a @frostgelato popsicle. #tmy

A post shared by Jessica Cox (@rightfooted) on

जेसिका ही मोटीव्हेशनल स्पीकर म्हणून काम करते. मला हात नाही म्हणून मला अनेक गोष्टी करताना अडचणी येत असतील असं लोकांना वाटतं पण तसं काहीही नसल्याचे जेसिका सांगते.