01 March 2021

News Flash

इम्रान खानऐवजी BBC Newsnight कडून वासिम अक्रमचा फोटो ट्विट, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

BBC Newsnight ने नंतर चूक सुधारली

ती चूक BBC News night ला पडली महागात

सध्या पाकिस्तानात सुरु असलेला सत्ताबदल हा जगभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. तेहरिक ए इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान होण्याच्या तयारीत आहेत. मतमोजणीमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने १०० चा आकडा ओलांडला आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या १३७ जागा न मिळाल्यास इतर पक्षांच्या मदतीने इम्रान खान सत्ता स्थापन करु शकतात.

BBC Newsnight या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर इम्रान खानऐवजी पाकचा माजी खेळाडू वासिम अक्रमची छोटीशी व्हिडीओ क्लिप पोस्ट केली.

मात्र ही चूक लक्षात येईपर्यंत नेटकऱ्यांनी BBC Newsnight ला चांगलचं ट्रोल केलं. सोशल मीडियावर BBC Newslight कडून झालेल्या या चुकीचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

काही वेळानंतर BBC Newsnight ने आपली चूक मान्य करत ट्विटरवर माफीही मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 1:17 pm

Web Title: pakistan elections 2018 bbc newsnight confuses imran khan with wasim akram gets trolled
टॅग : Imran Khan,Wasim Akram
Next Stories
1 BSNL चा Jio पेक्षा स्वस्त प्लॅन, 60GB डेटा आणि अमर्यादित कॉल्स
2 युट्यूबवर व्हिडीओ पाहून केली पत्नीची डिलिव्हरी आणि…
3 Google Docs सुधारणार तुमचं इंग्रजी ; ग्रामर आणि स्पेलिंगही शिकवणार
Just Now!
X