ढासळती अर्थव्यवस्था, दहशतवाद या मुद्यांवरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. पण पाकिस्तानच्या एक महिला मंत्र्याला मात्र इम्रान खान यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. ही महिला मंत्री इम्रान खान यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात आहे. ती इम्रान खान यांचे कौतुक करताना थकत नाहीय. इम्रान खान यांचे कौतुक करतानाचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होतोय. झरताज गुल वंझीर असे या महिला मंत्र्याचे नाव आहे. इम्रान सरकारमध्ये त्या पर्यावरण राज्यमंत्री आहेत. झरताज गुल वंझीर काय म्हणाल्या? इम्रान खान करिष्माई व्यक्तिमत्वाचे नेते आहेत. आपल्या हास्यानेच ते समोरच्याला जिंकून घेतात. "इम्रान खान यांच्या देहबोलीबद्दल आपण बोलत असू तर, त्यातून त्यांचे करिष्माई व्यक्तिमत्व दिसते" झरताज गुल वंझीर यांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. PM Imran Khan has a killer smile . videos have been made showing his body language . when he walks into a crisis . such charisma of his personality . whatever doubts we have go away: Pakistan's Minister for Climate Change Zartaj Gul Wazir pic.twitter.com/YXcfLCovaS — omar r quraishi (@omar_quraishi) January 24, 2020 "इम्रान खान ज्या पद्धतीने चालतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वास अधिकार आणि दबदबा दिसतो. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांना पाहूनच त्या शंकांचे निरसन होते" असे झरताज गुल वंझीर म्हणाल्या. या व्हिडीओवरुन झरताज गुल वंझीर सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर ट्रोलही होत आहेत.