एकीकडे उष्णतेच्या लाटेमुळे प्रचंड उकाडा वाढला आहे सामान्य व्यक्तीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, या कडाक्याच्या उन्हात रेल्वेगाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने रेल्वे प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे गाड्यांमध्ये इतकी गर्दीची आहे की, लोकांना शौचालयात बसून प्रवास करावा लागत आहे.तर कोणी बेडशीट बांधून झोका तयार करावा लागतो आहे. जनरल कोच असो वा स्लीपर किंवा एसी कोच, सर्वांची अवस्था सारखीच आहे. या संपूर्ण प्रकरणावर रेल्वेचे म्हणणे आहे की, उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई आणि सुगीचा हंगाम यामुळे गाड्यांना गर्दी होत आहे. याशिवाय, देशभरात उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात असून स्थानकांवर प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्यात आल्याचा रेल्वेचा दावा आहे.

२३ एप्रिल रोजी ब्रह्मपुत्रा मेलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची भीषण परिस्थिती अशी होती की, एका व्यक्तीने बेडशीटचा वापर करून तात्पुरता झोका बांधून प्रवास केला. जेणेकरून त्याला गर्दीच्या सामान्य डब्यात कमीत कमी जागा मिळेल ल्वे गाडी एवढी खचाखच भरलेली होती की लोक जमिनीवर, दरवाजाजवळ, तसेच शौचालयाच्या आत बसलेले दिसत होते. रेल्वेमध्ये तात्पुरता झोका तयार करणारा व्यक्ती त्यात झोपलेला दिसत होता. “रेल्वेमध्ये जागा नाही. याचा परिणाम म्हणून लहान मुलांनाही त्रास होत आहे,” असे एका प्रवाशाने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले.

हेही वाचा – बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल

अभिषेक जैस्वाल, इतर अनेक प्रवशांप्रमाणे रेल्वेमध्ये चढण्यात यशस्वी झाला पण अर्थातच तिथे जागा नव्हती. त्यांनी इंडिया टुडेला सांगितले “मला मुगलसरायहून पाटण्याला जायचे आहे, पण रेल्वेची अवस्था वाईट आहे. स्लीपर सामान्य झाला आहे. एसी गाड्यांची अवस्था स्लीपर कोचपेक्षा वाईट आहे,” तो म्हणाला.

हेही वाचा – ” ना एसी, ना अन्न, ना पाणी, वॉशरूममध्ये जाण्यासाठी…..!”, गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा Video Viral

गाड्यांमधील गर्दीबद्दल इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना, राजेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितले की, “भारतीय रेल्वे सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लवकरच विशेष गाड्या चालवल्या जातील.”

“उन्हाळ्यात ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक आपल्या मुलांसह घरी परततात. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. सध्याच्या सुगीच्या हंगामामुळे लोकांनीही आपापल्या गावी जाणे सुरू केले आहे. या क्षणी ट्रेनमध्ये जास्त गर्दी होण्यामागे हेच कारण आहे,” राजेश गुप्ता यांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले.

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शिक्षिकेने केले असे काही…..Viral Video पाहून पोट धरून हसाल!

“अशा परिस्थितीत रेल्वेने नेहमीच विशेष गाड्यांची संख्या वाढवली आहे. गेल्या वर्षी रेल्वेने ६३६९ विशेष गाड्या चालवल्या होत्या. या वर्षी, आम्ही आधीच ९१११ सहलींचे नियोजन केले आहे आणि रेल्वे सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. जास्त गर्दीच्या बाबतीत विशेष गाड्या चालवल्या जातात,” ते पुढे म्हणाले.

हेही वाचा – Work-Life Balance, ते काय असतं? इथे भर रस्त्यात स्कूटर चालवत तरुणीची मोबाईलवर सुरु आहे ऑफिस मिटिंग, पाहा Video

भारतीय रेल्वे, खरं तर, अशा कडक उन्हात प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे.

“अनेक स्थानकांमध्ये वॉटर व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना थंड पाण्याची सोय व्हावी यासाठी कुलर देण्यात आले आहेत. ” असेही त्यांनी सांगितले.