07 March 2021

News Flash

…आणि पोपटाने केली ऑनलाइन खरेदी

ऐकावे ते नवलच

ऑनलाइन खरेदी करणारा लंडनमधील बडी नावाचा पोपट

पाळीव पोपट म्हणजे आपल्या मालकाला फॉलो करणारा पक्षी. हा पोपट घरातील निरोप देणे, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे यांसारखी कामे अगदी सहज करतो. त्याला शिकवलेली भाषा तो अतिशय कमी वेळात शिकतो आणि ती बोलायलाही लागतो. आलेल्या पाहुण्यांना आपल्या गोड आवाजाने म्हणाल ते बोलून दाखवतो. आपल्या मालकाला फॉलो कऱणारा हा पोपट काय करु शकतो हे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. पोपटाच्या करामतीने त्याचा मालकही हैराण झाला.

यंत्रमानवामुळे माणसं बेरोजगार होतील?; पाहा आनंद महिंद्रांनी काय उत्तर दिलं

पोपटाच्या मालकाने एक अॅप्लिकेशन वापरुन त्यावरुन ऑनलाइन खरेदी केली. या अॅप्लिकेशनमध्ये ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्यांची नावे बोलून दाखवल्यावर तो रेकॉर्डिंग व्हॉईस त्या संबंधित कंपनीला पाठवला जातो आणि त्या वस्तू तुम्हाला घरपोच मिळतात. मालकानेही अशा पद्धतीने अॅपवरून वस्तू मागवल्याचे पोपटाने पाहिले. मग त्याने अशाच प्रकारे अनेक वस्तू मागवल्या. या पोपटाने ‘अॅमेझॉन अॅलेक्सा’ या अॅप्लिकेशनवरुन ८७० रुपयांचे गिफ्ट बॉक्स मागवले. लंडनमध्ये हा प्रकार घडला आहे.

अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र

बडी असे या पोपटाचे नाव आहे. त्याने मागवलेल्या वस्तू घरपोच मिळाल्यावर याबाबत मालकाच्या पत्नीने त्यांना आणि मुलाला विचारले. पण आपण अशा वस्तू मागवल्याच नाहीत, असे दोघांनी सांगितले. या वस्तू पोपटाने मागवल्याचे त्यांना काही वेळातच समजले. बडीने वस्तू मागवल्याचे समजल्यानंतर मला खूप हसू आले. त्याने सोनेरी रंगाचे गिफ्ट बॉक्स मागवले होते. बडी नेहमीच आनंदी असतो. आमच्याकडे एक मांजरही आहे. तो तिचीही नक्कल करतो. आपल्या करामतींमुळे तो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. अफ्रिकन भाषेतही तो शपथ घेतो. आम्ही झोपायला जातो त्यावेळी तो आम्हाला ‘शुभरात्री’ अशा शुभेच्छाही देतो, असे या मालकीण बाईंनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 12:33 pm

Web Title: parrot done online shopping on amazons owner got surprised
Next Stories
1 उत्तर कोरियातील नागरिकांची हेअरस्टाईल कशी असावी हे हुकूमशहाच ठरवतो
2 यंत्रमानवामुळे माणसं बेरोजगार होतील?; पाहा आनंद महिंद्रांनी काय उत्तर दिलं
3 Viral Video : तो आला, सापाला पकडून लुंगीत टाकलं आणि ….
Just Now!
X