06 July 2020

News Flash

क्वारंटाइनमध्ये आणखीन एक चॅलेंज… या फोटोत कुत्रा शोधून दाखवा

तुम्हाला सापडतोय का बघा या फोटोमध्ये कुत्रा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेकदा वेगवेगळी कोडीही सोशल मिडियावर व्हायरल होतात आणि मग त्याचे उत्तर शोधण्यासाठी नेटीझन्समध्ये एकच स्पर्धा लागते. काहीवेळा यामध्ये वाळलेल्या पानांतील साप शोधायला सांगितलेला असतो, तर काही वेळा आणखी काही. सध्या लॉकडाउनमुळे अनेक जण घरीच असल्याने सोशल नेटवर्कींगवर चॅलेंजचेही पेव फुटल्याचे चित्र दिसत आहे. मात्र एका चॅलेंजची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे. ते चॅलेंज म्हणजे फोटोमध्ये पग प्रजातीचा कुत्रा शोधून दाखवणे.

तीन एप्रिल पासून एक फोटो सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक पग कुत्रा लपला आहे तो शोधून दाखवण्याचं आवाहन फोटो पोस्ट करणाऱ्या महिलेने दिलं आहे. या महिलेच्या सांगण्याप्रमाणे तिने पोस्ट केलेल्या फोटोत तिचा पग कुत्रा लपला आहे. तिच्या या फोटोवर दोन हजारहून अधिक जणांनी कमेंट करुन कुत्रा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सापडतोय का बघा बरं…

व्हायरल झालेल्या या फोटोला एक लाख ८६ हजार जणांनी रिट्विट केलं आहे. अनेकांनी यावर मेजदार कमेंटही केल्या आहेत.

मला सापडला तेव्हा मी हसू लागलो

माझी पहिली रिअॅक्शन होती

तुम्हालाही असचं वाटतयं का?

हा घ्या तुमचा कुत्रा

सापडला मला…

तुम्हीपण बघा बरं परत एकदा सापडतोय का? काय म्हणताय नाही सापडतं चला आम्हीच दाखवतो कुठे आहे हा कुत्रा…

हे पण ट्राय करा >> Viral: या फोटोमध्ये बिबट्या शोधून दाखवा, नेटकरीही थकले तुम्हाला सापडतोय का पाहा

कळलं का? त्या बाकड्याचा हॅण्डल आहे ना त्याच्या अगदी मागे बसला आहे कुत्रा. किती जणांना खरोखर कुत्रा सापडला पाहू कमेंट करुन नक्की सांगा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 5:24 pm

Web Title: people online try to spot a pug hidden in the picture scsg 91
Next Stories
1 करोना पसरवण्याची धमकी देणे १८ वर्षीय मुलीला पडले महागात, बसला १५ लाखांचा फटका
2 सलाम! लॉकडाउनमुळे निराधार झालेल्या रुग्णाला डॉक्टरने स्वत:च्या हाताने भरवलं जेवण
3 ‘२१ दिवस आम्ही घरी असतो तर…’, मुंबई पोलिसांची उत्तरं ऐकून तुम्ही किती नशिबवान आहात हे समजेल
Just Now!
X