24 October 2020

News Flash

Video: हॉटेलमधील जोडप्यांचे सेक्स करतानाचे आवाज ऐकण्यासाठी तो करायचा ‘हे’ कृत्य

पोलिसांनी एका २८ वर्षीय व्यक्तीला अटक केली

पोलिसांनी केली अटक

एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील अनुभव कधी खूप चांगला असतो तर कधी अगदीच धक्कादायक. असंच काहीसं घडलं आहे चीनमध्ये. येथील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती जोडप्यांच्या रुमबाहेरील लॉबीमध्ये फिरत जोडप्यांचे सेक्स करतानाचे आवाज रेकॉर्ड करताना अढळला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एका २८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या नैऋत्येकडील चोंगकिंग प्रांतातील जिनआंगजीन जिल्ह्यामधील एका हॉटेलमध्ये राहणाऱ्या जोडप्यास आपल्या खोलीबाहेर कोणीतरी असल्याचा संशय आला. मध्यरात्रीच्या सुमारास दाराच्या फटीमधून काही सावल्यांची हलचाल होत असल्याचे या जोडप्याला दिसले. दरवाजाबाहेर कोणीतरी असल्याचे वाटल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेत हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्याची विनंती केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून पाहिले असता हॉटेलच्या लॉबीमध्ये मध्यरात्रीनंतर एक व्यक्ती गाईप्रमाणे रांगत रांगत रुमच्या दरवाजाजवळ जाऊन मोबाईलमध्ये रुममधील आवाज रेकॉर्ड करताना दिसला. मोबाईल दरवाजाच्या फटीजवळ ठेऊन आवाज रेकॉर्ड करुन तो ऐकल्यावर पुन्हा दुसऱ्या दरवाजाजवळ जाऊन ती व्यक्ती असचं करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. शाँगफू पोलिसांनी या प्रकरणामध्ये एका २८ वर्षीय व्यक्तीला लोकांच्या खासगी आयुष्यात दखल देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक केली आहे. या व्यक्तीचे अडनाव ही असे आहे.

अटक करण्यात आल्यानंतर या व्यक्तीने हो आपण जोडप्यांचे आवाज रेकॉर्ड करत असल्याची कबुली दिली आहे. ही व्यक्ती मागील अनेक महिन्यांपासून या हॉटेलमध्ये येऊन जोडप्यांच्या बाजूच्या रुममध्ये राहत असे आणि रात्रीच्या वेळी त्यांच्या खासगी क्षणांच्या वेळेचे आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असे. ‘आपल्या शारीरिक आणि मानसिक गरजा भागवण्यासाठी आरोपी हे कृत्य करत होता,’ अशी प्रतिक्रिया पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 11:37 am

Web Title: pervert filmed crawling on hotel corridor to hear couples having sex in rooms scsg 91
Next Stories
1 Seltos चा ‘जलवा’, Kia Motors ची टॉप 10 मध्ये एंट्री
2 Redmi 8 चा फ्लॅशसेल, किंमत 7,999 रुपये
3 Twitter लवकरच बंद करणार Retweets पर्याय?
Just Now!
X