कारच्या टपावर बसलेल्या लांब केसाच्या तरुणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. थायलंडमधील एका छायचित्रकाराने गाडीच्या टपावर दिसणारी तरुणीची सावली भूत असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी गाडीच्या मागील टपावरटॉप परिधान करुन बसल्याचे दिसते. छायाचित्रकाराने ही सावली म्हणजे भूत आहे, असा दावा केल्यामुळे हा व्हिडिओ अधिक लोकप्रिय होताना दिसतोय. व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी थायलंड पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ छायाचित्रकार पोवेरट कटकुलने आपल्या कँमेरात कैद केला. थायलंड संस्कृतीमध्ये भूत-प्रेत या प्रथा मानल्या जातात.

[jwplayer EudBqFgK]

थायलंडमधील रामा आय एक्स नावाच्या रस्त्यावर रविवारी ही घटना घडल्याची माहिती छायचित्रकाराने पोलिसांना दिली. संबंधीत व्हिडिओमध्ये कारमधील व्यक्ती आपल्या सहकाऱ्याला मला जी प्रतिमा दिसत आहे, ती तुलाही दिसत आहे का? असा सवालही विचारताना ऐकायला मिळते.  ‘डेली मिरर’ने  दिलेल्या वृत्तानुसार थायलंड पालिसांनी संबंधीत घटनेतील कारची नोंदणी वाहतुक विभागाने रद्द केल्याचे म्हटले आहे. कारचा परवाना रद्द केल्यानंतर हा  नंबर एका ब्राउन ओपेल टॅक्सीला देण्यात आला होता.  मात्र या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसणारे वाहन टॅक्सी नव्हे तर लाल रंगाची कार असल्यासारखे दिसते. व्हिडिओची सत्यता पडताळू पाहण्यासाठी थायलंड पोलीस वाहन क्रमांकाच्या माहितीच्या साहय्याने चौकशी करत आहेत.

[jwplayer 2E3r8bGI]

यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही वेळेला अशा प्रकारच्या दृष्यांचा भास होतो की, ज्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. अशा भीतीदायक घटनांना भूताची उपमा देण्यात येते. काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधील एका पबमध्ये भूत सीसीटीव्ही कँमेरामध्ये कैद झाल्याचा दावा करण्यात आला होता.या घटनेतील व्हिडिओची देखील सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगली होती.