News Flash

हेल्मेट घालून दुचाकीवरुन कुत्र्याचा प्रवास, नेटकरी पडले प्रेमात

फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

नवीन मोटार वाहन कायद्यासंबंधी अनेक चर्चा सुरु असून युक्तिवाद करण्यात येत आहेत. दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याने सोशल मीडियावर एकीकडे संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे मीम्स तयार करुन कायद्याची खिल्ली उडवली जात होती. मात्र यावेळी या कायद्यामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान एका कुत्र्याच्या हेल्मेट घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुत्रा दुचाकीवर हेल्मेट घालून प्रवास करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या कुत्र्याच्या प्रेमात पडले आहेत. फोटोत कुत्रा मालकाच्या मागे स्कुटीवर हेल्मेट घालून अत्यंत शांतपणे बसल्याचं दिसत आहे. हा फोटो सप्टेंबर महिन्यातील आहे. नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आल्यानंतर लगेचच हा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

हा जुना फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हा फोटो दिल्लीमधील आहे.

काहीजणांनी हा कुत्रा दिल्ली वाहतूक पोलिसांच्या वाहतूक सुरक्षा मोहिमेचा भाग असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 6:21 pm

Web Title: photo of dog wearing helmet viral on social media sgy 87
Next Stories
1 तान्ह्या मुलीशी सांकेतिक भाषेत बोलतोय कर्णबधीर पिता; नेटकरी फिदा
2 दरोडा घालायला आला आणि भलतंच करुन गेला; पाहा व्हिडीओ…
3 अजब! चीनमध्ये पुलाखाली अडकलं विमान, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत
Just Now!
X