पीएनबी घोटाळ्यातील फरार असलेला नीरव मोदी सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यामध्ये तो एका भाजपाच्या नेत्यासोबत दिसत आहे. आता हा नेता नेमका कोण असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्यासोबत नीरव मोदी या फोटोमध्ये दिसत आहेत. यामध्ये इतर लोकही आहेत. त्यात ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्सही दिसत आहेत. या फोटोवरुन सोशल मीडियावर लोक भरपूर चेष्टा करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच नीरव मोदीची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो अशाचप्रकारे व्हायरल झाला होता. नेटीझन्सनी या फोटोवरुन अनेक विनोद करत मोदींवर आणि भाजपावर हल्लाोबल चढवला होता. आता पुन्हा या नव्या फोटोमुळे भाजपावर होणाऱ्या टीकेत भर पडण्याची शक्यता आहे. महिला पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. तसेच याखाली त्यांनी प्रिन्स चार्ल्स, कॅमिला आणि खासदार पूनम महाजन यांच्याबरोबर नीरव मोदी याचा खास फोटो असे लिहीले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोखाली मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या असून त्यातील अनक प्रतिक्रिया मजेशीर आहेत. नीरव जिथे कुठे असशील तिथून घरी परत ये, तुला कोणीच काहीच बोलणार नाही. सगळे आरोप आधीच काँग्रेसवर लावून झाले आहेत. तुझे बाबा तुझी वाट पाहत असून तुझ्या भावाचेही रडून रडून हाल झाले आहेत. त्यामुळे असशील तिथून तू परत ये. तर अनेकांनी यामध्ये भाजपाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हात असल्याचे आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.