26 February 2021

News Flash

अनोखं लग्न…आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच बांधली लगीनगाठ, पाच दिवसांनी पुन्हा जावं लागणार तुरूंगात

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून १० लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप

(फोटो सौजन्य : ट्विटर @RonijaaRohit)

एका महिला आरोपीने चक्क एका न्यायाधीशासोबतच लग्न केल्याचा अनोखा प्रकार समोर आलाय. राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या पिंकी मीना यांना लाचखोरीच्या आरोपात अटक झाली. हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पण 10 दिवसांच्या अंतरीम जामिनावर असताना मंगळवारी त्यांचा विवाह झाला. विशेष म्हणजे, त्यांचे पती न्यायाधीश आहेत. त्यामुळे राजस्थानात सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा रंगली आहे.

पिंकी मीना या पहिल्याच प्रयत्नात आरएएस (RAS) अर्थात राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. तर, पिंकी मीना यांचे पती नरेंद्र दौसा हे राजस्थानच्या बसावाचे असून राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये (RJS) निवड झाल्यापासून त्यांची सध्या जयपूरमध्ये ट्रेनिंग सुरू आहे.  मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप पिंकी मीना यांच्यावर आहे. याप्रकरणी त्या जवळपास महिन्याभरापासून तुरूंगात होत्या. लग्नासाठी पिंकी मीना यांनी राजस्थान उच्च न्यायालयाकडे जामिन मागितला होता, त्यावर कोर्टाने त्यांना 10 दिवसांचा अंतरीम जामिन मंजूर केला होता. २१ फेब्रुवारी रोजी त्यांचा जामिनाचा कालावधी संपणार आहे, त्यामुळे २१ तारखेला मिना पुन्हा सरेंडर करतील.

जानेवारी महिन्यापर्यंत मिना या राजस्थानमधील बांदीकुईच्या उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस हायवेचं कंत्राट असलेल्या कंपनीकडून १० लाख रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला व  राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना १५ जानेवारी रोजी अटक केली. नंतर त्यांनी कनिष्ठ न्यायालयात लग्नाचं कारण सांगून जामिन मागितला होता, पण कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामिन नाकारला. त्यानंतर मिना यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. यावेळीही न्यायाधीशासोबत लग्न केल्यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो असं म्हणत सरकारी वकिलांनी मिना यांच्या जामिनाला विरोध केला होता. पण, अखेर कोर्टाने मिना यांना १० दिवसांचा जामिन मंजूर केला. आता लग्न झाल्यानंतर मीना या २१ तारखेला पुन्हा सरेंडर करतील, त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, मीना यांची लग्न पत्रिकाही चांगलीच चर्चेत होती. ‘इतना ही लो थाली में… व्यर्थ न जाए नाली में…’ यासह कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेशही नियमंत्रण पत्रिकेवर लिहिण्यात आले होते. आरोपी आणि न्यायाधीश विवाहबंधनात अडकल्याने सध्या या लग्नाची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 12:51 pm

Web Title: pinky meena woman who landed in prison in bribery case gets married to a judge in rajasthan sas 89
Next Stories
1 Video : लाइव्ह मीटिंगमध्ये पतीला Kiss करायला आली पत्नी, उडाला गोंधळ; IPS अधिकारी म्हणतात…
2 BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीने नोंदवली पोलिस तक्रार, जाणून घ्या प्रकरण
3 Video : वरातीत कारचं ‘सनरुफ’ उघडून नाचत होती नवरी, तितक्यात सुसाट आलेल्या गाडीने वऱ्हाड्यांना चिरडलं
Just Now!
X