१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ‘सेवा सप्ताह’ची घोषणा केली. यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा भाजपाचा विचार आहे. मात्र एकीकडे भाजपाने सेवा सप्ताहची घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तर भाजपाच्या ‘सेवा सप्ताह’ला आवाहन म्हणून हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचंही आवाहन विरोधकांनी केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसला. त्याचप्रमाणे ट्विटरवर #बेरोजगार_सप्ताह हा हॅशटॅगही वापरला जात आहे.

नक्की पाहा >> ७० वा वाढदिवस ७० कार्यक्रम; मोदींच्या वाढदिवसाचा भाजपाचा ‘मास्टर प्लॅन’

सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उत्तरेतील राजकारण चांगलेच तापले आहे. मागील वर्षी पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस पक्षाच्या माध्यमातून एक आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर यंदा मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा मानस आहे. हीच गोष्ट लक्षात घेत बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी ट्विटरवरुन हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं.

यानंतर अनेकांनी #NoMoreBJP आणि #बेरोजगार_सप्ताह हे हॅशटॅग वापरुन ट्विट केलं. त्यामुळेच #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी रात्री भारतामधील टॉप ट्रेण्डींग हॅशटॅगच्या यादीत पाचव्या स्थानी आला होता.

#बेरोजगार_सप्ताह या हॅशटॅगसंदर्भातील काही ट्विट

असा साजरा करा आठवडा

राष्ट्रीय बेरोजगार दिवस

पश्चिम बंगाल काँग्रेसचीही यामध्ये उडी

४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच

कशावर चर्चा व्हावी आणि कशावर होतेय

भाजपा असा साजरा करणार मोदींचा वाढदिवस

एकीकडे मोदींच्या वाढदिवसाच्या आठवड्याचे सेलिब्रेशन हे बेरोजगार सप्ताह म्हणून करण्याचं आवाहन केलं जात असलं तरी दुसरीकडे भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास प्लॅन केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाहीय. मात्र अनेक ठिकाणी छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. मोदींचा वाढदिवस साजरा करताना कोणत्याही प्रकारे करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही याबद्दल विशेष काळजी घेण्यात येणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये करोनाचे नियम पाळले जावेत यासंदर्भातील सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आहे. मागील एका वर्षामध्ये भाजपा सरकारने काय काम केलं आहे याबद्दलची माहिती पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जनतेपर्यंत पोहचवण्याचा भाजपाचा विचार आहे.