07 July 2020

News Flash

… म्हणून ‘Remove China Apps’ गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवलं

काही दिवसातचं हे अ‍ॅप झालं होतं लोकप्रिय

गुगलनं प्ले स्टोअरवरून रिमूव्ह चायना अ‍ॅप्स हे अ‍ॅप हटवलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीनं मोबाईलमध्ये असलेली चीनची अ‍ॅप हटवण्यासाठी मदत मिळत होती. यापूर्वी गुगलनं ‘मित्रो’ हे अ‍ॅपदेखील प्ले स्टोअरवरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पॉलिसीचं उल्लंघन केल्यामुळे हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. परंतु कंपनीनं अद्याप हे अ‍ॅप का काढून टाकलं आणि पुन्हा ते उपलब्ध होईल की नाही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु अ‍ॅप तयार करणाऱ्या OneTouchAppLabs ने हे अ‍ॅप गुगलनं प्ले स्टोअरवरून हटवल्याची माहिती दिली. दरम्यान, कंपनीनंदेखील यामागील कारण अद्याप स्पष्ट केलं नाही. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सध्या देशासमोर करोनाचा संकट असतानाच लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच चीनमधून करोना विषाणूचा जगभरात संसर्ग झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता या सीमेवर चीनने सुरु केलेल्या खुरापतींमुळे भारतीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यातच प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक यांनी आठवड्याभरामध्ये चीनी अ‍ॅपचा वापर बंद करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला अगदी सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचा फायदा एका भारतीय अ‍ॅपला झाला आहे. या अ‍ॅपचे स्क्रीनशॉर्ट आत्तापर्यंत तुम्ही अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीमध्ये बघितले असतील. या अ‍ॅपचे नाव आहे ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’

वांगचुक यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीयांनी चीनी मालाबरोबर सॉफ्टवेअरचाही वापर कमी केला पाहिजे असं आवाहन केलं. “हार्डवेअरबरोबरच भारतातील तरुण मुलं टीकटॉक, शेअरइट सारख्या चीनी अ‍ॅपच्या वापराच्या माध्यमातून चीनला अनेक कोटींची मदत करत असतील. त्यामुळेच आपण एकत्र येऊन चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु करावी. ही मोहीम भारतासाठीही एक वरदान ठरेल. आपण हे सामान वापरणं बंद केलं तर देशातील सामान वापरुन आणि त्यामधून पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर बनू,” असा विश्वास वांगचुक यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अनेकांनी आपल्या मोबाइलमधील चीनी अ‍ॅप शोधण्यास सुरुवात केली. मात्र वर वर बघता भारतीय किंवा अमेरिकन अ‍ॅप कोणते आणि चीनी अ‍ॅप कोणते हे ओळखणे कठीण असते. त्यामुळेच अनेकांनी गुगल प्ले स्टोअरवरील ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ची मदत घेतली. हे अ‍ॅप अल्पावधीत एवढे लोकप्रिय झाले होते की मोफत अ‍ॅपच्या यादीत हे अव्वल स्थानी पोहचले होते.

‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ आहे तरी काय?

‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ हे १७ मे रोजी गुगल प्लेवर उपलब्ध झालं होतं. अवघ्या पंधरा ते सोळा दिवसांमध्ये १० लाखांहून अधिक जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं. तर एक लाख ९१ हजारहून अधिक जणांनी या अ‍ॅपला रेटींग दिलं असून गुगल प्ले स्टोअरवर याला पाच स्टार रेटींग मिळालं होतं. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर ते मोबाइलमधील चीनमधील कंपन्यांच्या मालकीची आणि चीनमध्ये डेव्हलप झालेली अ‍ॅप शोधून काढते. अशा अ‍ॅपची लिस्ट स्क्रीनवर झळकते. या यादीमधील जे अ‍ॅप युझर्सला काढायचे आहे त्या अ‍ॅपसमोरील डिलीट बटण क्लिक करुन हे अ‍ॅप अनइन्स्टॉल क्लिक करुन अ‍ॅप मोबाइलमधून काढून टाकता येत होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 8:53 pm

Web Title: remove china apps indian app removed from google play store jud 87
Next Stories
1 आनंद महिंद्रांच्या ट्विटला रितेश देशमुखचा भन्नाट रिप्लाय; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल
2 Viral Video: वादळापासून वाचण्यासाठी शेडखाली खांब पकडून उभा होता अन्…
3 केरळ : हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु, फटाक्यांनी भरलेलं फळ खायला दिल्याने झाला होता मृत्यू
Just Now!
X