01 March 2021

News Flash

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला चिमुकल्यानं लिहिलं भावस्पर्शी पत्र

सचिनने ते पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे

अरमान नावाच्या लहानग्या चाहत्यानं सचिनला एक पत्र लिहिलं आहे.

क्रिकेटचा देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चाहता वर्ग खूप मोठ आहे. अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांचाच सचिन लाडका आहे. फक्त भारतीयच नाही तर भारताबाहेरही या देवाचे खूप चाहते आहेत. या कोट्यवधी चाहत्यांपैकी एका लहानग्या चाहत्यानं सचिनला भावस्पर्शी पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यानं स्वत:ला सचिनसारखं व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. हे पत्र वाचून सचिननं लहानग्या चाहत्याचे आभार मानत ते पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच मेहतनत करत राहण्याचा सल्लाही त्याने या लहानग्या चाहत्याला दिला आहे.

अरमान नावाच्या लहानग्या चाहत्यानं सचिनला एक पत्र लिहिलं आहे. ”मी तुझा ‘सचिनः अ बिलिअन ड्रीम्स’ हा चित्रपट नुकताच पाहिला. तू माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. मला मनापासून तुझ्यासारखंच व्हायला आवडेल. एकेदिवशी मी सुद्धा तुझ्यासारखी देशासाठी ट्रॉफी जिंकेन.’ असं अरमाननं आपल्या पत्रात लिहिलं. तसेच सचिनने त्याला स्वत:ची स्वाक्षरी असलेली बॅटही दिली होती त्यासाठीही त्यानं सचिनचे आभार मानले. सचिनने या चाहत्याचं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. तसेच पत्राबद्दल आभार मानत खूप मेहनत करण्याचा सल्लाही त्याला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 4:21 pm

Web Title: sachin tendulkar little fan armaan write letter for him
Next Stories
1 विमानाच्या कॉकपिटमध्येच सुरू झालं वैमानिक पती-पत्नीचं भांडण, प्रवाशांचे जीव टांगणीला
2 तुरूंगात थंडी वाजते, मग तबला वाजवा- न्यायाधीशांचा लालूंना सल्ला
3 Viral : कोट्यवधी किंमतीची जगातील सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला
Just Now!
X