24 November 2020

News Flash

पराभूत सेरेनासाठी पतीनं लिहिला प्रेरणादायी संदेश

'दहा महिन्यांपूर्वी ती मृत्यूच्या दारात उभी होती. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत ती पराभूत झाली असली तरी यापुढे ती नक्कीच यशस्वी होईल'

सेरेनाचा पती अलेक्सिस यानं ट्विटरवर सेरेनाचा फोटो शेअर केला.

विम्बल्डन महिला एकेरी अंतिम सामन्यात टेनिसची सम्राज्ञी सेरेना विल्यम्स पराभूत झाली. मुलगी जन्माला आल्यानंतर सेरेनाच्या दमदार कमबॅकचं सगळीकडूनच कौतुक झालं. मात्र यावेळी टेनिसची सम्राज्ञी जर्मनीच्या अँजेलिक कर्बरकडून पराभूत झाली. अर्थात तिच्या पराभवामुळे चाहते नाराज झाले. सेरेनाकडून तिच्या चाहत्यांना खूपच अपेक्षा होत्या. मात्र हा सामना पराभूत झालेल्या सेरेनासाठी तिच्या पतीनं एक सुंदर संदेश लिहिला आहे.

सेरेनाचा पती अलेक्सिस यानं ट्विटरवर सेरेनाचा फोटो शेअर केला. ‘आताशी कुठे सुरूवात केलीये, आमची मुलगी जन्मला आल्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी मी माझ्या पत्नीचं शेवटचं चुंबन घेतलं कारण मला आणि खुद्द तिलाही माहिती नव्हतं की ती जिवंत परत येईल. तिला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आलं. तिच्या जगण्याची खात्री नव्हती. मी तिचा शेवटचा निरोप घेतला. ती फक्त जगावी एवढीच प्रार्थना आम्ही करत होतो. पण आज दहा महिन्यांनी ती खेळली आणि विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचली’ असं म्हणत अलेक्सिसनं तिच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे.

‘सेरेनानं आता कुठे नवीन सुरूवात केली आहे. ती हरली तरी मला खात्री आहे पुढच्यावेळी ती नक्की जिंकेन आणि मुलीसाठी तर ती खात्रीपुर्वक जिंकेन.’ असा विश्वासही त्यानं चाहत्यांना दिला आहे. पण याबरोबर सेरेनाला पराभूत करून उत्तम खेळी केलेल्या अँजेलिक कर्बरचंही त्यानं कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2018 5:10 pm

Web Title: serena williams husband alexis ohanian wrote beautiful message after wimbledon loss
Next Stories
1 गायकाला मिठी मारणाऱ्या सौदी महिलेला पोलिसांनी केलं अटक
2 विकृतपणाचा कळस, अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या मोहिमेची विटंबना
3 Viral Video : दारू पिऊन स्टंटबाजी करणं तरुणाला पडलं महागात
Just Now!
X