19 September 2020

News Flash

हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है – स्मृती इराणी

आधी केलेल्या वक्तव्याची इराणी या फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून पाठराखण करत असल्याचे दिसते.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन त्यांच्यावर विरोधकांनी आणि सामान्यांनीही आगपाखड केली होती. केंद्रीय पदावरील महिला मंत्री महिलांच्याच बाबतीत असे वक्तव्य करते यावरुन त्यांच्यावर राग व्यक्त केला जात होता. त्यानंतर आता स्मृती इराणी यांनी स्वत:च आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील फोटो एडिट करुन तोंड बांधलेल्या सासूच्या जागी या फोटोमध्ये इराणी यांना दोराने बांधण्यात आले आहे. या पोस्टवर त्यांनी ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असेही लिहिले आहे. त्यामुळे आपल्या या पोस्टद्वारे त्या टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहेत.

२ तासांत त्यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टला ६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांना आपल्या तुलसी या मालिकेतील भूमिकेतून आता बाहेर या असा टोला लगावला आहे. त्यामुळे आधी केलेल्या वक्तव्याची इराणी या फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून पाठराखण करत असल्याचे दिसते. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

View this post on Instagram

#hum bolega to bologe ki bolta hai… 😂🤔🤦‍♀️

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

देवाच्या मंदिरात जाणं आणि तिथे जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला होता. तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकत नाही तर मग देवाच्या मंदिरात तुम्ही जाताना त्या अवस्थेत कशा काय जाल? महिलांना मासिक पाळी येते ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाण्याचा हट्ट आणि प्रार्थना करण्याचा हक्क कसा काय बजावू शकता? असा प्रश्न विचारत हे माझे वैयक्तिक मत आहे असेही इराणी यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 1:35 pm

Web Title: smriti iranis reply to critics by instagram post and photo of kyunki sas bhi kabhi bahu thi
Next Stories
1 Flaunt Your Wealth: संपत्तीचा माज दाखवणारं सोशल चॅलेंज व्हायरल
2 दिवाळी बोनस! हिरे व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांना दिल्या ६०० कार
3 ….पुन्हा अनुभवता येणार टायटॅनिकचा प्रवास
Just Now!
X