News Flash

Viral Photo: कलिंगडाच्या फोडीवर टोमॅटो केचप टाकल्याने नेटकऱ्यांमध्ये संताप; म्हणाले…

या फोटोवर अनेकांनी व्यक्त केली नाराजी

(फोटो: Twitter/Jungleebilli_)

उन्हाळा म्हटलं की तो काही गोष्टींशिवाय पूर्ण होतं नाही त्यातही खास करुन खाण्याचे काही पदार्थ उन्हाळ्यामध्ये हवेच. यामध्ये अगदी जांभळांसारख्या रानमेव्यापासून ते आंबा, कैरी पन्ह, फणस, कलिंगड यासारख्या गोष्टींचा तर हमखासपणे समावेश होतो. त्यातही आंबे आणि कलिंगड अनेकांना खास प्रिय असतात. अनेकदा किंमत बघून आंब्याच्या दुकानांची ‘पायरी’ चढणं सामान्य टाळतात. यंदात तर आंब्याचा सारा मौसम करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनमध्येच गेल्याने अनेक खाद्यप्रेमींची निराशा झाली. मात्र यावेळी कलिंगड खाऊन आनेकांनी आपला उन्हाळा जमेल तसा साजरा केला.

उन्हाळ्याच्या दिवसांत हमखास आणि आंब्यांपेक्षा स्वस्तात उपलब्ध असणारे कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. मात्र हेच कलिंगड सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे ते अगदीच विचित्र कारणामुळे. एका व्यक्तीने चक्क कलिंगडाच्या खापेवर टोमॅटो केचप टाकल्याचा फोटो ट्विट केला आहे. सध्या हा फोटो आणि त्यावरील प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

नक्की वाचा >> कलिंगड: गरापासून ते साल आणि बियांपर्यंत सर्वकाही आरोग्यदायक; जाणून घ्या १५ फायदे

“तुम्ही अशापद्धतीने कलिंगड खाल की तुम्ही नॉर्मल आहात?”, अशा कॅप्शनसहीत कलिंगडाच्या फोडीवर टोमॅटो  केचप टाकल्याचा फोटो एका युझरने ट्विट केला आहे.

अर्थात यानंतर अपेक्षेप्रमाणे अनेकांनी या फोटोबद्दल नाराजी व्यक्त करत हा तर कलिंगडावर झालेला अत्याचार आहे असं मत व्यक्त केलं आहे. पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचं म्हणणं..

१) कलिंगडावर अत्याचार…

२) ए भाऊ असं नको करुन ना…

३) तुझी तक्रार करतो थांब

४) सातवी नापास

५) धक्काच बसला

६) हे बघून असं काहीतरी झालं

७) चप्पल फेकून मारेन

८) डोळ्यांना त्रास झाला

९) हे कसं करता येईल?

१०) पहिली प्रतिक्रिया

११) नाही रहायचं इथे आता

१२) काय पाप केलं आहे आम्ही?

१३) हे सहन करणार नाही

तुम्हाला असं प्रयोग करायला आवडेल का आणि या फोटोबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 11:37 am

Web Title: someone posted a picture of ketchup on watermelon scsg 91
Next Stories
1 कोणी ‘सॅनिटायझर’ घ्या कोणी ‘क्वारंटाइन’ घ्या; जुळ्यांच्या अजब नावांचे गजब कारण
2 चीनविरोधातील ‘तो’ व्हिडिओ टिकटॉकने काढला; भारतीय टिकटॉकरचा दावा
3 धोनी आणि डीव्हिलियर्सलाही लाजवेल असा अजब फटका आणि थेट SIX
Just Now!
X