25 February 2021

News Flash

टॅक्सी ड्रायव्हरने सात तास ‘डाराडूर’ झोप काढून कमवले तब्बल 11 लाख रुपये, Video व्हायरल!

या टॅक्सी ड्रायव्हरने काहीही न करता फक्त सात तास झोप काढून कमवले तब्बल 11 लाख रुपये...

पैसा कमवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते, अनेकदा तर प्रचंड मेहनत घेऊनही हाती काहीच लागत नाही. अशात, एखाद्याला काहीही न करता फक्त झोपून पैसे कमवता येतील का?…काहीजण भलेही हे अशक्य असल्याचं म्हणतील. पण, एका 26 वर्षांच्या टॅक्सी ड्रायव्हरने हे करुन दाखवलंय. त्याने सलग सात तास झोप काढून 11 लाख रुपये कमवलेत.

Live स्ट्रीमिंगद्वारे लाखो रुपयांची कमाई :-
हा तरुण Asian Andy नावाचं एक युट्यूब चॅनल चालवतो आणि लाइव्ह गेमिंग स्ट्रीमिंग करतो. अशाच एका लाइव्ह स्ट्रीमिंग शोमधून त्याने 16 हजार डॉलर (जवळपास 11 लाख रुपये) कमवलेत. या स्ट्रीमिंगदरम्यान तो डाराडूर झोपला होता आणि लोकांनी डोनेशन करुन किंवा डिस्टर्ब करुन झोपेतून उठवावं असं चॅलेंज त्याने दिलं होतं. नंतर अनेकजण पैसे डोनेट करुन त्याच्या झोपेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते. लोकांनी त्याच्या झोपेत व्यत्यय आणण्याचा बराच प्रयत्न केला, पण तरीही त्याने सात तासांची झोप काढली. काहींनी त्याला घाबरवण्याचाही प्रयत्न केला, त्यासाठी विविध आवाजातील ऑडिओ क्लिप्स पाठवल्या. पण त्याची झोप कोणी मोडू शकलं नाही. एवढ्यावेळात त्याने जवळपास 11 लाख रुपयांची कमाई केली. स्टिव्हन असं या तरुणाचं नाव असून त्याचा जन्म व्हिएतनाममध्ये झालाय, पण तो कॅलिफोर्नियामध्ये राहतो. युट्यूबवर त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त जणांनी बघितलं असून इतकी जास्त कमाई झाल्यानंतर त्यानेही सर्वांचे आभार मानलेत.

सध्या हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 10:00 am

Web Title: taxi driver earned 11 lakh rupees by taking 7 hours of sleep in youtube dwell streaming watch video and know the way sas 89
Next Stories
1 नेटकरी म्हणतायत, “श्वेता माईक बंद करो” ; काय आहे हे उघड गुपित?
2 “वाऱ्याची झुळूक शरीरात गेल्याने गरोदर झाले”, महिलेच्या अजब दाव्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास
3 १११ जणांचा कॉल अन् श्वेताने सांगितलेली सेक्स स्टोरी; जाणून घ्या हे Shweta Meme प्रकरण आहे तरी काय?
Just Now!
X