करोनामुळे नवीन वर्षाच्या स्वागतावर अनेक निर्बंध असतानाही अगदी उत्साहामध्ये २०२१ चं स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे अनेकांनी घरी राहूनच नवीन वर्षाचं अगदी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थिती स्वागत केलं. रस्त्यावर गर्दी करु नका, पोलिसांचा बंदोबस्त, वारंवार करण्यात आलेली जनजागृती यासर्वांमुळे यंदा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोकं घराबाहेर पडले नाहीत. मात्र दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर नवीन वर्षाचं स्वागत अगदी सालाबादप्रमाणे यंदाही पद्धीतने झालं. हॅशटॅग, पोस्ट, कमेंटस, लाईक, शेअरच्या जगात नवीन वर्षाचं स्वागत करताना करोनामुळे फारसं काही बिघडल्याचं चित्र दिसलं नाही. अनेकांनी तर २०२० संपत असल्याचा आनंद शब्दात मावेनासा असून २०२१ कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत असं सांगतानाच २०२० मधील अनेक संकल्प आणि राहून गेलेल्या गोष्टी यंदाच्या वर्षी करण्याचा निर्धार केलाय.

एकंदरितच ज्या पद्धतीने २०२० मध्ये करोनापासून ते नैसर्गिक आपत्ती आणि इतर घडामोडी घडल्या त्यावरुन २०२१ मधील पदार्पणाचा आनंद आपसुकच दिसून येत होता. मात्र अशाच आनंदाच्या भरात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यावद यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी एक ट्विट केलं. मात्र या ट्विटमध्ये त्यांनी केलेल्या एका चुकीमुळे ते आता ट्रोल होत आहेत. सामान्यपणे नवीन वर्ष बदलल्यानंतर तारीख लिहिताना पहिले काही दिवस आपल्यापैकी अनेकजण गोंधळतात. म्हणजे जोपर्यंत नवीन वर्ष आलं आहे आणि तशी तारीख लिहिली पाहिजे हे सवयचं होत नाही तोपर्यंत अशा तारखेतील खाडाखोडीच्या चुका होतात. पण लालू प्रसाद यांच्या मुलाने जाणाऱ्या वर्षाचे आकडेच चुकवलेत. सन २०२० ला निरोप देताना तेज प्रताप यांनी, “अलविदा.. बीस हज़ार बीस..!” असं ट्विट केलं आहे. म्हणजेच तेज प्रताप यांनी २०२० ऐवजी सन २००२० ला निरोप दिलाय.

यावरुन अर्थात ते ट्रोल होत आहेत. या ट्विटला दीड हजारहून अधिक रिट्विट आहेत. मात्र त्यापैकी एक हजार ४०० रिट्विट हे कोटेड म्हणजेच त्यावर कमेंट करुन केलेले रिट्विट आहेत. पाहुयात लोकं काय म्हणतायत.

१) शिक्षण महत्वाचं आहे

२) हे भाषांतर करुन बघा समजेल काय हुशार माणूस आहे

३) हा सर्वात हुशार माणूस आहे

४) हीच अपेक्षा होती

५) ती ब्लू टीक काढा

६) भविष्यातून आलेला

७) हे माजी मंत्री आहेत

८) बिहारची पोरं

९) आठवीची परीक्षा द्या

१०) टर्मीनेटर

११) पृथ्वीला ओव्हरेट केला

१२) म्हणून शाळेत जावं

१३) घ्या आम्हाला ठाऊकच नव्हतं

१४) पहिला विनोद

१५) एवढ्या वर्षांआधीच शुभेच्छा देतायत

सोशल नेटवर्किंगवर #Welcome2021, #NewYear, #NewYear2021 हे हॅशटॅगही दिसून आले. मात्र या साऱ्यामध्ये तेज प्रताप यादव यांचं ट्विट अनेकांसाठी मस्करीचा विषय ठरलं हे मात्र खरं.