News Flash

‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’साठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त */- रुपये

पूर्वी १९ रुपये मोजावे लागत होते

ट्रायनं नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधा शुल्कात ८० टक्क्यांनी घट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आतापर्यंत आपला नंबर दुसऱ्या कंपनीच्या सेवेसाठी पोर्ट करण्यासाठी १९ रूपयांचे शुल्क मोजावे लागत होते. पण, हे शुल्क लवकरच घटवण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) यासाठीचा प्रस्ताव मांडला आहे.

नेटवर्क वर्तुळातील दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याची मुभा देणारी नंबर पोर्टेबिलिटी ही सुविधा १ जानेवारी २०११ पासून सुरू करण्यात आली. नोव्हेंबर २००९ मध्ये दूरसंचार नियामक प्राधिकरणाने या सेवेसाठी १९ रुपये शुल्क निश्चित केले होते. पण, लवकरच हे शुल्क घटून ४ रुपये होणार आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय मोठ्याप्रमाणावर कमी झाली. सुरूवातीच्या काळात या सुविधेसाठी १९ रूपये आकारले जाणे योग्य होते. मात्र, आताच्या काळात हे शुल्क जास्त आहे, असा अभिप्राय नोंदवत ट्रायने नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधा शुल्कात ८० टक्क्यांनी घट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे लवकरच ग्राहकांना नंबर पोर्टेबिलिटीसाठी फक्त ४ रुपये मोजावे लागणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 11:11 am

Web Title: the telecom regulatory authority of india reduce mnp charges to 4 rs
Next Stories
1 बराक ओबामा झाले नाताळबाबा!
2 Video : इतकी मोठी नूडल तुम्ही कधी पाहिलीये?
3 VIDEO : जगातील सर्वोत्तम विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचा आनंद कसा असतो माहितीये?