News Flash

Video : अशी चोरी कोणता मूर्ख चोर करतो?

व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

पारदर्शक पिशवीतून या चोराचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात साफ दिसत होता.

चोरी करताना आपण पकडलं जाऊ नये यासाठी चोर किती खबरदारी घेतात हे काही वेगळं सांगायला नको. एखादा सराईत चोर चोरी केल्यानंतर सुईएवढाही पुरावा मागे ठेवण्याची चूक करत नाही. इतकंच कशाला आपला चेहराही कोणी पाहून नये म्हणून तो पुरेपुरे झाकण्याची दक्षता ते घेतात. पण, सध्या एका महामूर्ख चोराच्या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चोराचा आत्मविश्वास इतका की चेहरा झाकण्यासाठी त्यानं आपल्या चेहऱ्यावर चक्क प्लॅस्टिकची पिशवी घातली होती. त्यानं दुकानातली जवळपास १ लाखांची रोकड लुटली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मालकानं सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा मात्र हा व्हिडिओ पाहून त्याला हसू अक्षरश: अनावर होत होतं.

हँडसम असण्याचे तोटे, कर्मचाऱ्याचा १०% पगार कापला

VIDEO : बैलाचा महिलेवर हल्ला, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

पारदर्शक पिशवीतून या चोराचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात साफ दिसत होता. आश्चर्य म्हणजे आपल्याला दुसरं कोणी पाहत तर नाहीये ना हे पाहण्यासाठी त्यानं अनेकदा आपली पिशवी बाजूला केली होती. त्यामुळे त्याचा चेहरा कॅमेरात कैद झाला. मग काय दुकानदारानं तातडीनं या चोराची माहिती पोलिसांना दिली आणि काही तासांतच त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 5:22 pm

Web Title: thief hides face with transparent plastic bag gets arrested
Next Stories
1 हँडसम असण्याचे तोटे, कर्मचाऱ्याचा १०% पगार कापला
2 VIDEO : बैलाचा महिलेवर हल्ला, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
3 तेलुगू देसम पक्षाचे खासदार साडी नेसून पोहोचले संसदेत
Just Now!
X