भारत आणि पाकिस्तान यांचे संबध वितुष्टाचे. सिमेवर सतत होणारे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्ले, पाकची दुटप्पी भूमिका, शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. अशात उरी हल्ल्याचा बदला घेत भारताने सर्जिकल स्ट्राईक्स करत पाकला धडा शिकवला आहे. त्यामुळे पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांमधून मोदींवर अनेक आक्षेपार्ह बातम्या छापून येत आहेत. अशातच दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिकेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ही वृत्तनिवेदिका मोदींवर आक्षेपार्ह टिका करताना दिसत आहे.

Viral Video : डोनाल्ड ट्रम्प मुळचे पाकिस्तानचे! पाक वृत्तवाहिनीचा जावईशोध

मोदींच्या पाकिस्तानी धोरणावर आक्षेपार्ह विधान करणारा पाकिस्तानी वृत्तनिवेदिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मोदी साहेब आपको लाख बार समझाया है, लेकिन कब समझ मे आया है? हर बार आते हो, बुरी नियत लाते हो, हर बार पीठ दिखाते हो, दुम दबाकर भागते हो, हर बार मार खाते हो और पहलेसे बुरी तराह खाते हो’ असे वृत्तनिवेदिका आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातील बोलताना दिसत आहे. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर काही महिन्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. या वृत्तनिवेदिकेचे आणि वृत्तवाहिनीचे नाव समजू शकले नाही. पण, युट्युबर आतापर्यंत १ लाख ३० हजारांहूनही अधिक लोकांनी तो पाहिला आहे. दोन मिनीटांचा हा व्हिडिओमध्ये  कश्मीरचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. बुरहान वानीला या दहशतवाद्याला ठार केल्यानंतर काश्मीर मध्ये जे दंगे उसळले ते थोपवण्यासाठी सरकारने गोळ्या चालवल्या. यात अनेक मुलं दृष्टीहिन झाले असून मोदींनी त्यांच्या भविष्याची राखरांगोळी केली असल्याचाही आरोप या निवेदिकेने केला आहे. या व्हिडिओची विश्वासहार्यता ‘लोकसत्ता’ने तपासली नाही. पण हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर तसेच सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral Video : पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला पोलिसाची मारहाण