वाहतूक पोलिसांच्या नावानं अनेक जणं बोटं मोडतात, अर्थात अनेकदा त्यासाठी चालकांना आलेले वाईट अनुभवही तितकेच कारणीभूत असतात. पण, प्रत्येकजण भ्रष्टाचारी असतोच असं नाही काहीजण अजूनही आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे आणि तितक्याच मेहनतीनं बजावत असतात. एएनआय या वृत्तसंस्थेनं नुकताच कोईंबतूरच्या रस्त्यावरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एक वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावरचा खड्डा बुजवताना दिसत आहे.

Viral Video : विमानात अंतर्वस्त्रे सुकवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ झाला व्हायरल

Viral Video : दैव तारी त्याला कोण मारी! भीषण अपघातातून सुदैवानं वाचलं कुटुंब

तामिळनाडूच्या पाणीपुरवठा विभागानं कामासाठी रस्त्यात खड्डा खणला होता. पण काम झाल्यानंतर कर्मचारी खड्डा न बुजवताच निघून गेले. त्यामुळे कोईंबतूर कोर्ट परिसरासमोरच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. चालकांना गाडी चालवण्यास अडचणी येत होत्या. तेव्हा या समस्येवर मार्ग काढत वाहतूक विभागाच्या एका पोलिसांनं हातात फावडा घेत खड्डा बुजवण्यात सुरूवात केली. खड्डा बुजल्यानंतर काही प्रमाणात वाहतूकीची कोंडी कमी झाली आणि चालकांना सुरक्षितरित्या त्या रस्त्यावरून जाता आलं, त्याची कामाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा पाहून अनेकांनी या वाहतूक पोलिसाचं कौतुक केलं.