जुळ्या मुलांना ओळखणं बऱ्याचदा अनेकांना अवघड जात. मात्र, त्याचे आई-वडील त्यांना बरोबर ओळखू शकतात, असंही म्हटलं जात. परंतू अशाच एका घटनेत जुळ्या मुलांच्या आई-वडिलांनाही आपली मुलं ओळखता येणं कठीण गेल्याचं उदाहरण समोर आलं आहे. त्यासाठी यांपैकी एकाच्या अंगावर त्याच्या आईनं टॅटू गोंदवून घेतला. मात्र, सोशल मीडियातून ही बाब व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संबंधित आईला चांगलंच फैलावर घेतलं.

याप्रकरणी बाळांच्या आईनं एका पोर्टलशी बोलताना सांगितलं की, “या टॅटूमुळे संबंधित बाळाला ओळखता येण आणि इंजेक्शन देणं सोपं जाईल, यासाठी मी टॅट्यू काढण्याचा निर्णय घेतला. कारण टॅट्यू काढलेल्या बाळावर सध्या दर आठवड्याला औषधोपचार केले जात आहेत.”

परदेशात ही घटना घडली असून कामानिमित्त घराबाहेर जाताना मुलांची आई असलेली ३१ वर्षीय महिला आपल्या जॅक आणि अॅडम या जुळ्या मुलांना सासूकडे ठेवून जात असे. एकदा जॅकला इंजेक्शन द्यायचं होंत मात्र दोन्ही मुलं सारखीच दिसत असल्याने जॅक ऐवजी चुकून अॅडमलाच इंजेक्शन दिलं गेलं. तसेच अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये या मुलांच्या वडिलांनाही त्यांना ओळखनं अवघड जातं असल्याचंही या महिलेनं म्हटलं आहे.

मुलांना ओळखताना अनेकदा गोंधळ होत असल्याने भविष्यात काही गंभीर चूक होऊ नये म्हणून या मुलांच्या आईने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ठरवलं त्यानंतर डॉक्टरांनी तिला जॅकच्या अंगावर टॅट्यू काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खोडरबरच्या आकाराचा २ मिमीचा टॅटू तीने जॅकच्या एका कानाच्या पाळीवर गोंदवला आहे, जो सहजपणे दिसून येतो.