नोकरी मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. नोकरी मिळाली नाही की सहाजिकच लोक निराश होतात. त्याच वेळी काही लोक कधीकधी नोकरी मिळाली नाही म्हणून चुकीचे पाऊल देखील उचलतात. पण आयर्लंडमधील एका तरुणाने असे पाऊल उचलले की ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पदवीधर ख्रिस हर्किन नावाच्या मुलाने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता, पण त्याची निवड कुठेही होत नव्हती. त्याला एका आठवड्यात ३०० ठिकाणी नाकारण्यात आले. अशा परिस्थितीत ख्रिसला अशी कल्पना सुचली, की तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

२०१९ पासून आहे बेरोजगार

एका इंग्रजी संकेतस्थळाच्या अहवालानुसार, ख्रिस हर्किन नोकरी न मिळाल्याने नाराज होता. अशा परिस्थितीत त्यांनी शहरात नोकरी मिळवण्यासाठी होर्डिंग लावले. यासाठी त्याने सुमारे ४० हजार रुपये खर्च केले. बोर्डमध्ये क्रिसने त्याच्या फोटोसह प्लीज हायर मी लिहिले आहे. त्यावर तीन मुद्यांमध्ये त्याने त्याचे शिक्षण आणि अनुभवही सांगितले आहे. २४ वर्षीय हर्किन सप्टेंबर २०१९ पासून बेरोजगार आहे.

अशी सुचली कल्पना

होर्डिंग लावण्याची कल्पना ख्रिस हर्किनला त्याच्या बहिणीशी झालेल्या संभाषणादरम्यान सुचली. त्याची बहीण सोशल मीडिया मॅनेजर आहे. ती जाहिरात मोहिमेसाठी बिलबोर्ड लावण्याचे काम करत होती.

देशभरात होर्डिंग्जची चर्चा आहे, तरीही नोकरी नाही

नोकरी मिळवण्यासाठी संपूर्ण शहरात होर्डिंग्ज लावल्यानंतर क्रिस देशभरात ठळक बातम्यामध्ये झळकला . या होर्डिंग्ज व्यवस्था करण्यासाठी क्रिशला सुमारे ४० हजार रुपये खर्च करावे लागले. ऑनलाईन साइट मिररनुसार, क्रिशने होर्डिंगमध्ये मोठ्या अक्षरात लिहिले आहे – ‘प्लीज हायर मी’. या बिलबोर्ड मध्ये त्याने आपले कौशल्य आणि USP बद्दल सांगितले आहे. त्याने साइन बोर्डवर लिहिले की तो पदवीधर आणि अनुभवी सामग्री लेखक आहे. क्रिशच्या या कल्पनेनंतर त्याला प्रसिद्धी मिळाली पण नोकरी अजूनही त्याच्या हातात नाही.

तुम्हाला कशी वाटली ही कल्पना?