01 March 2021

News Flash

मालकिणीचा आदेश येताच म्हशीने फिल्मी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, बघा Viral Video

Video : फिल्मी गाण्यावर म्हशीने केला जबरदस्त डान्स

एखाद्या म्हशीला नाचताना कधी बघितलंय का? तुम्ही विचार करत असाल म्हैस कशीकाय नाचू शकते?? पण सोशल मीडियावर सध्या असाच हसून लोटपोट करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका घराबाहेर बांधललेल्या दोन म्हशी दिसत असून दोन्ही म्हशींच्या अंगावर शाल टाकली आहे. तितक्यात एक महिला म्हशींना चारा टाकण्यासाठी येते आणि काही सेकंदांनंतर ‘ढोलक बज जावे’ नावाचं गाणं गात नाचायला सुरूवात करते. महिला नाचत असताना काही क्षणापर्यंत म्हैस शांतपणे चारा खात असते. पण, पुढच्याच सेकंदाला ती महिला म्हशीलाही नाचायाला सांगते. महिलेचा आवाज ऐकून लगेच म्हैसही उड्या मारुन मारुन नाचायला सुरूवात करते. बघा व्हिडिओ :-


म्हशीचा हा डान्स सोशल मीडियामध्ये नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(आजीचा दरारा…डान्स थांबवून आजोबांनी ठोकली ‘धूम’; हसून लोटपोट करणारा व्हिडिओ तुफान व्हायरल)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 11:23 am

Web Title: video of a buffalo dancing with its owner viral on the internet see video sas 89
Next Stories
1 १५७ वेळा नापास झाल्यानंतर अखेर ‘तो’ पास झाला Driving Test ..
2 आजीचा दरारा…डान्स थांबवून आजोबांनी ठोकली ‘धूम’; हसून लोटपोट करणारा व्हिडिओ तुफान व्हायरल
3 Video : …म्हणून Amazon चा डिलेव्हरी बॉय चक्क घोड्यावरुन आला
Just Now!
X