07 April 2020

News Flash

ऑफिसमध्ये ‘मुकाबला’ गाण्यावर थिरकल्या CEO, व्हिडिओ तुफान व्हायरल; हर्ष गोयंका म्हणाले…

कर्मचाऱ्यांसोबत थिरकल्या कंपनीच्या CEO

वेल्सपन (Welspun) इंडिया लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली गोयंका यांनी ऑफिसमध्ये असं काही केलंय की त्यांचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतंय. त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत चक्क बॉलिवूडच्या एका गाण्यावर धमाकेदार डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय.

दिपाली यांनी आपल्या ऑफिसमध्ये ‘स्ट्रीट डांसर 3डी’ (Street Dancer 3D)मधील ‘मुकाबला’ या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला. त्यांना नाचताना पाहून कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याबरोबर थिरकायला सुरूवात केली. अखेरीस गाणे संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी दिपाली यांच्या धमाकेदार डान्ससाठी टाळ्या वाजवून दाद दिली. दिपाली यांच्या डान्सचा व्हिडिओ आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी शेअर केला असून त्यांनी दिपालीचं कौतुक केलंय. हर्ष गोयंका यांनी व्हिडिओ शेअर करताना, “कार्यालयात एखाद्या सीईओला कर्मचाऱ्यांसोबत नाचताना बघणं म्हणजे दुर्मिळ दृष्य… कार्यालयातील वातावरण खेळीमेळीचं ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे” असं ट्विट केलंय. हर्ष गोयंका यांनी केलेलं ट्विट दिपाली यांनीही री-ट्विट केलं आणि, “शेअर करण्यासाठी धन्यवाद हर्ष गोयंका…मला तुमचंही कार्यालय बघायला आवडेल”, असं म्हटलं.

सोशल मीडियावर दिपाली यांचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. अनेकांनी, ‘सर्व ऑफिसमध्ये असंच खेळीमेळीचं वातावरण असायला हवं’, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – (प्रियंका गांधींची ‘लव्ह स्टोरी’ : 13 व्या वर्षी पहिली भेट, 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 11:32 am

Web Title: video of welspun indias ceo dipali goenka dancing with employees is going viral sas 89
टॅग Ceo
Next Stories
1 मुलांचं TikTok अकाउंट आता पालकांना करता येणार कंट्रोल
2 Video : जगातलं सर्वात मोठं मैदान आतमधून कसं दिसतं पाहिलंत का??
3 शिवजयंती विशेष: “महाराष्ट्राच्या मालकाचं नाव एकेरी घेणं बंद करा”
Just Now!
X