25 November 2020

News Flash

Video: सुशांतच्या लाडक्या ‘फज’ला काय करावं कळेना; सुशांतला शोधत घरभर फिरतो आणि…

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या पाळीव कुत्र्याचे व्हिडिओ झाले व्हायरल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांबरोबरच बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला आहे. इतकचं नाही सुशांतचा लाडका कुत्रा फज यालाही सुशांतच्या जाण्याचा मोठा धक्का बसला आहे. फजचे काही व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून एका व्हिडिओमध्ये तो घरभर नुसता सैरभर धावत सुशांतला शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर मागील आठवडाभरापासून फज दु:खी असल्याचे दिसून येत आहे. तो मागील अनेक दिवसांपासून केवळ त्याच्या बेडवर पडून आहे. दरवाजात कोणी आलं की सुशांत आल्याप्रमाणे तो दरवाजाकडे पळतो आणि पुन्हा निराश होऊन बेडवर येऊन पडतो. फजचा सध्या हाच दिनक्रम सुरु आहे.

नक्की वाचा >> आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच सुशांत-रियामध्ये ‘या’ कारणावरुन झालं कडाक्याचं भांडण

तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये फज समोर ठेवलेल्या मोबाइल स्क्रीनवर सुशांतचा फोटो बघताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही क्षणानंतर फज मोबाइलची स्क्रीन प्रेमाने चाटतो आणि त्यानंतर तोंड फिरवतो असंही दिसतयं. मागील अनेक वर्षांपासून फज सुशांतबरोबरच आहे.

एका मुलाखतीमध्ये सुशांतने मला फजबरोबर रहायला आवडतं. तो अगदी लहान असल्यापासून माझ्याकडे आहे. तो मला कधीही माझ्या कोणत्याही कामावरुन जज करत नाही त्यामुळे मला त्याची सोबत खूप आवडते असं सांगितलं होतं.

नक्की वाचा >> “त्याला आवाज ऐकू यायचे, माणसं दिसायची… त्यामुळेच घाबरुन रिया त्याला सोडून गेली”

पोलिसांनी दिलेली माहिती आणि शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये सुशांतने आत्महत्या केल्याचे उघड झालं आहे. मात्र सुशांतने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी ठेवलेली नाही. त्यामुळे सुशांतने नक्की आत्महत्या का केली यासंदर्भात पोलीस तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये सुशांतच्या जवळच्या अनेक लोकांची चौकशी मागील काही दिवसांपासून सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 8:09 am

Web Title: videos sushant singh rajputs pet dog devastated trying to find him in house scsg 91
Next Stories
1 “आम्हाला शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे”, सीमारेषेवर निघालेल्या मुलांचं देशप्रेम पाहून पोलीसही भारावले
2 Father’s Day 2020 : मुंबई पोलीसांची मुलं म्हणतात, माझे बाबा सुपहिरो आहेत !
3 योग दिवस तर आहेच, पण २१ जूनचं हे वैशिष्ट्य तुम्हाला माहितीये?
Just Now!
X