२१ डिसेंबर २०२० संदर्भात सध्या इंटरनेटवर अनेक चर्चा आणि अफवांना उधाण आलं आहे. यामध्ये आज जगाचा अंत होणार आहे इथपासून ते आज एक विनाशकारी शक्ती जन्म घेणार आहे असे अनेक अफवाही पसरवल्या जात आहे. जवळजवळ ८०० वर्षानंतर गुरु आणि शनी ग्रह एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत. पृथ्वीवरुन हे दोन्ही ग्रह जणू एकमेकांना स्वत:मध्ये सामवून घेत आहेत असं दृष्य दिसेल. पृथ्वीपासून लाखो किमी दूर घडणाऱ्या या घटनेला पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमस स्टार (Christmas Star) आणि द ग्रेट कंजक्शन (The Great Conjunction) असं म्हटलं जात आहे. याचसंदर्भात आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

वेगवेगळे सिद्धांत माडंणाऱ्यांपैकी एक असणारे थियॉलॉजिस्ट असणाऱ्या पॉल बेगली यांनी आज घडणारी खगोलीय घटना ही पृथ्वीवासाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली आहे. याच दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात छोटा दिवस आणि सर्वात मोठी रात्र असणार आहे. यासंदर्भात जगभरातील विज्ञानप्रेमी आणि अंतराळ विषयामध्ये रस असणारे अनेकजण खूपच उत्सुक आहेत. कॉन्सपिरेसी थेअरी म्हणजेच कट सिद्धांत मांडणारे काही जाणकार आजच्या दिवशी जगाचा विनाश होणार आहे अस सांगत आहेत.

बेगली यांनी दावा केला आहे की पुढील ५०० वर्षे गुरु आणि शनी ग्रह एकमेकांच्या जवळ येणार नाहीत. माया संस्कृतीवर विश्वास ठेवणाऱ्यांनुसार आजचा दिवस हा जगाचा अंत होण्याचा दिवस आहे, असंही बेगली यांनी सांगितलं आहे. मात्र ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नसून हा दावा केवळ मायन संस्कृतीच्या कालगणनेच्या आधारे केला जात आहे. माया संस्कृतीच्या कालगणनेनुसार २१ डिसेंबर २०१२ हा ५ हजार १२६ वर्षांच्या एका कालचक्रचा शेवट असेल असं सांगण्यात आलं होतं.

कट सिद्धांत मांडणाऱ्या काहीजणांच्या मते आजची तारीख ही प्रयलाची तारीख आहे. जगाचा अंत कसा होणार यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहे. यामध्ये सुर्याच्या किरणांपासून पृथ्वीला एक कृष्णविवर (ब्लॅक होल) गिळून टाकेल इथपासून ते निबीरु नावाच्या एका काल्पनिक ग्रहाला पृथ्वीची धडक बसेल इथपर्यंत अनेक सिद्धांत मांडण्यात आलेत. माया संस्कृतीच्या कालगणनेनुसार २१ डिसेंबर २०२० च २१ डिसेंबर २०१२ आहे. मात्र वैज्ञानिकांची हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. काही सिद्धांतवाद्यांच्या दाव्यानुसार वर्षाच्या शेवटी दिसलेला चकणारा तारा भगवान येशूच्या जन्माच्या वेळी दिसला होता. मात्र आता असा तारा शैतानाच्या जन्माच्या वेळी दिसेल.