News Flash

VIRAL VIDEO: काॅपी करायची तर अशी (नाही)

एवढं डोकं अभ्यासात लावा ना!

प्रातिनिधिक फोटो

आपलं कसं सरळसोट आयुष्य. शाळेत अभ्यास करायचा. चांगले मार्क मिळवायचे. दहावीला टाॅपर, बारावीला टाॅपर, शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी. मग लग्न, मुलं, रिटायरमेंट आणि झालं!

पण यात काय मजा राव! सगळं गोड गोड झालं तरी कंटाळा येतो. थोडंसं तिखट, थोडंसं आंबट व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं आयुष्य सोडत खून,दरोडे टाका असं नाही, पण सारखं सरळ सरळ जायचासुध्दा कंटाळा येतो.

परीक्षा हा आपल्या सगळ्यांसाठी विद्यार्थीदशेतला मोठा प्रसंग असतो. मन लावून अभ्यास करणाऱ्यांना काही प्राॅब्लेम नाही पण वर्षभर उंडारणाऱ्यांसाठी हा काळ फार कठीण असतो. मग सुरू होतात निरनिराळ्या आयडिया. मग सुूरू होतात निरनिराळ्या युक्त्या, मग चिठ्ठ्या आणणं काय, हातावर लिहिणं काय, कंपाॅसबाॅक्सच्या खालच्या भागावर लिहिणं काय सगळं सगळं सुरू होतं.

VIRAL VIDEO : मला उत्तर माहितीये, पण प्रश्न काय आहे? – राहुल गांधी

परीक्षेच्या वेळी या काॅपीबहाद्दरांची तारांबळ उडते. पर्यवेक्षक आणि प्रसंगी पोलिसांची नजर चुकवत परीक्षेत चांगले मार्क ‘मिळवण्याची’ या सगळ्यांची धडपड सुरू होते. पण दिवसेंदिवस पर्यवेक्षकही चतुर होत असल्याने अशा काॅपीबहाद्दरांना पकडण्याची त्यांची हातोटीही चांगली होते आहे. पण तरीही या पर्यवेक्षकांना गुंगारा देत त्यांना चकवण्याचा प्रयत्न सगळ्याच विद्यार्थ्यांकडून होत असतो. पण या ना त्या कारणाने हे प्रयत्न अपुरे पडतात आणि हा काॅपीचा प्रकार उघडा पडतो. पहा

सौजन्य: फेसबुक

पर्यवेक्षकाला चकवण्यासाठी या मुलांनी चक्क एलसीडी स्क्रीनचा वापर केला. सुरूवातीला हा प्रकार खपला पण थोड्याच वेळात हे सगळं बाहेर पडलं आणि या मुलांची कंबक्ती भरली.

पण आम्ही काय म्हणतो राव, आपली बुध्दी काॅपीच्या नव्या टेक्निक शोधून काढायला वापरण्यापेक्षा तीच बुध्दी अभ्यासासाठी वापरली तर सगळी डोकेदुखी कमी होईल ना!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 6:09 pm

Web Title: viral video failed attempt of students to copy during exam
Next Stories
1 VIRAL : शाहरुखच्या सेल्फीमध्ये असणारी ‘ती’ सध्या काय करतेय?
2 हा खोटं बोलतोय भाऊ!!
3 हिटलरपासून ६६९ ज्यू मुलांना वाचवणारा देवदूत
Just Now!
X