News Flash

VIDEO: मुलगी ‘डोनाल्ड ट्रम्प’ना म्हणाली ‘तुम्ही शरमेची बाब’!

हा व्हिडिओ पाहाच

डोनाल्ड ट्रम्प म्हटलं की मनात अनेक भावभावना दाटून येतात. कुठल्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये एवढ्या टोकाच्या भावना कधीच नव्हत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्त्रियांविरोधी, स्थलांतरितांविरोधी, अपंगांविरोधी गरळ ओकणाऱ्या महाशयांना अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून जागा मिळावी ही जगाच्या दृष्टीने भयंकरच बाब आहे.

पण कोणी हे अध्यक्षमहाराजांच्या तोंडावर म्हणू शकेल का? ‘तुम्ही जगासाठी शरमेची बाब आहात’ असं कोणी ट्रम्प यांच्या तोंडावर म्हणू शकेल का? खालचा व्हिडिओ पाहा

सौजन्य- यूट्यूब 

ही छोटी मुलगी अध्यक्ष महाराजांना चक्क ‘तुम्ही जगासाठी शरमेची बाब आहात’ असं बेधडकपणे म्हणते आणि ट्रम्पसुध्दा ते अतिशय खेळीमेळीने घेतात. आश्चर्य आहे.

पण यातली मजेची बाब म्हणजे हे खरे डोनाल्ड ट्रम्प नाही आहेत तर त्यांची हुबेहूब नक्कल करणारा तिथला एक टीव्ही कलाकार आहे. त्याचं नाव आहे अँथनी अतामानुईक. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल करणाऱ्यांमध्ये हा अव्वल समजला जातो. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आणि अनेकांना साहजिकच हा अँथनी आहे हे कळलं नाही आणि ट्विटरवर नेहमीसारखं ट्रोलिंग सुरू झालं.

 

 

 

 

 

 

एकूणचे डोनाल्ड ट्रम्प हे सध्या जोक्ससाठी चलतीत आहेत असंच म्हणायचं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 10:04 pm

Web Title: viral video girl calls donald trump impersonator a disgrace to the world
Next Stories
1 Viral Video : माडाच्या झाडावर अन् तेही उलटं चढायचं..बाप रे बाप!
2 Viral Video : या नववधूला आवडतात ‘चीप थ्रिल्स’!
3 जवानांसाठी या वृद्ध जोडप्याने देऊ केली आयुष्यभराची कमाई!
Just Now!
X