12 August 2020

News Flash

Viral Video : पंजाबी शेतकरी जोडप्याने गायलं लता दीदींचं गाणं; ऐकून तुम्हीही म्हणाल वाह…

दाम्पत्यानं गायलेलं गाण सोशल मीडियावर व्हायरल

चंदीगड : पंजाबमधील हे शेतकरी दाम्पत्य लॉकडाउनच्या काळात लता मंगेशकर यांचं सुरेल गीत गात आपला वेळ घालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पंजाबमधील एक शेतकरी दाम्पत्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या दाम्पत्यानं गायलेलं गाण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. १९६२ मधील ‘प्रोफेसर’ या चित्रपटातील ‘आवाज देके हमें तुम बुलाओ…’ हे गाणं त्यांनी गायलं आहे.

‘आवाज देके हमें तुम बुलाओ…’ या गाण्यावर शेतकरी जोडप्यांची जुगलबंदी पाहायला मिळतेय. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गाणं दोघांनी अतिशय हुबेहुब गायलं आहे. या गाण्याला ट्विटरवर खूप पसंती मिळत आहे. एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी लालचंद यांनी सांगितले की, कुटुंबीयांसोबत राज्यस्थानला फिरायला गेल्यानंतर हे गाणं गायलं होतं. त्यांनी पत्नीसोबत गणेशगढ गावातील एका शेतात गाणं रिकॉर्ड केलं होतं.

या व्हिडिओला ट्विटरवर जितेंद्र एस जोरावत यांनी सोमवारी शेअर केलं आहे. त्यांनी सांगितलं की, ‘हा व्हिडिओ मला व्हॉट्सअॅपवर आला होता. आपले शेतकरी मित्र, मोकळ्या वेळात जीवनाचा असा आनंद घेत आहेत.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:16 pm

Web Title: viral video punjab farmer singing lata mangeshkar song with his wife nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 सुशांतच्या मृत्यूनंतर सर्वाधिक सर्च झाला ‘हा’ शब्द
2 बाप रे… कोट्यवधींच्या Lamborghini चा खरेदीनंतर अवघ्या २० मिनिटांत चुराडा
3 बापरे… अणुबॉम्बने चंद्र उडवण्याची होती अमेरिकेची तयारी, मात्र…
Just Now!
X