सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ पाहण्यासारखे असतात. प्रत्येक लग्न समारंभात हसण्याचे, आनंदाचे किंवा दुःखाचे काही क्षण असतात, जे वर्षानुवर्षे लक्षात राहतात. आता असाच एक लग्नाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे जो आपल्या आयुष्यभर लक्षात राहील.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वरमाळा सोहळ्यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत नवरदेव अडखळताना दिसत आहे. तो वधूला हार घालण्याचा प्रयत्न करताना मद्यधुंद असल्यामुळे स्टेजवर पडत आहे. व्हिडिओमध्ये नवरदेव प्रथम वरमाळा त्याच्या सासूच्या जवळ घेऊन जातो. वधूची आई मग त्याचा हात धरून त्याला थांबवते. त्याची वधू अगदी समोर उभी आहे, तरीही तो ही चूक वरमाळा समारंभात करतो. त्याला स्टेजवरही नीट उभ राहता येत नाही. काही क्षणांनंतर, त्याच्या मागे उभा असलेला एक माणूस त्याला पकडून खेचतो. त्यानंतर तो त्याला वधू नक्की कुठे आहे हे दाखवण्यास मदत करतो. नवरदेव वधूला वरमाळा घालण्याचा प्रयत्न करतो. पण तो अडखळण्यास सुरुवात करतो आणि सोफ्यावर पडतो. स्टेजवर ठेवलेल्या सोफ्यावर वर पडताच काही लोक त्याच्या मदतीसाठी पुढे येतात.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘सॉरी डार्लिंग’ हे गाणे देखील ऐकू येते. व्हिडीओ official_niranjanm87 द्वारे इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला. हा व्हिडीओ आतापर्यंत ६ लाख ८५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका वापरकर्त्यांने लिहले की “मला वाटते की हे वास्तव नाही. हा एक विनोदी व्हिडीओ आहे.” दुसरा वापरकर्त्यांने लिहले की “या नंतरही लग्न झालं असेल तर चूक नवरीची आहे.” तिसरा वापरकर्ता लिहतो की, “अशा मुलाशी कधीच लग्न करू नये.” तर काहींना हा व्हिडीओ फेक वाटला. एका वापरकर्त्यांने लिहले की “चांगला अभिनय केला आहे.” तर दुसरा वापरकर्ता लिहतो की “त्याला त्या मुलीशी लग्न करायचे नसेल.”

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?