तुम्हाला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला चोरीचा व्हिडिओ आठवतोय का? चोरी करायला आलेल्या दोन चोरांनी चक्क वीट फेकून इमारतीचा काचेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. पण, वीट दरवाज्यावर बसण्याऐवजी दुसऱ्याच चोराच्या डोक्यात बसली तो जागीच बेशुद्ध झाला. शेवटी आपण पकडले जाऊ या भीतीनं बेशुद्ध चोराला सावरत दुसऱ्या चोरानं तिथून पोबारा केला. हा मजेशीर प्रसंग व्हायरल झाल्यानंतर असाच एक मजेशीर प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
वाचा : भारतीय ख्रिश्चन व्यावसायिकानं स्वखर्चातून मुस्लिम बांधवांसाठी बांधली मशीद
कॅलिफोर्नियामधल्या एका इमारतीमधला हा व्हिडिओ आहे. चोरानं बनावट किल्ली तयार करून ऑफिस फोडलं. इथल्या महत्त्वाच्या वस्तू लुटल्या. ही लूट यशस्वी झाल्यानंतर चोरानं चक्क ब्रेकडान्स करत आपला आनंद साजरा केला. ऑफिसमध्ये सीसीटीव्ही आहेत याचा त्याला कदाचित विसर पडला असावा. पोलिसांनी त्याच्या ब्रेक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
वाचा : Wow! दिल्ली- अमेरिका प्रवास करा फक्त १३ हजार ५०० रुपयांत
या इमारतीमधील ऑफिसची बनावट चावी त्यानं तयार करून घेतली आहे. तिचा वापर करून तो ऑफिसमध्ये आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चेहरा पूर्णपणे झाकला असल्यानं पोलिसांना त्याला ओळखता आलं नाही, मात्र लवकरच त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
VIDEO: Security camera catches thief breaking it down after breaking into a #California business https://t.co/8y8IRURSaz pic.twitter.com/m8q7IAPIhz
— KXAN News (@KXAN_News) May 14, 2018