News Flash

पाणी, बर्फ शोधण्यासाठी ऑर्बिटरला चंद्राच्या आणखी जवळ नेणार ?

ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे.

चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला आहे. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-२ मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे. पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली १० मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आपण इतिहास घडवू असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला. ऑर्बिटरची कक्षा बदलून त्याला चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा इस्रोमध्ये विचार सुरु असल्याचे एका वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

ऑर्बिटरमध्ये एकूण आठ पेलोड आहेत. मोहिमेसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्टये पूर्ण केल्यानंतर ऑर्बिटरची कक्षा बदलण्याचा विचार आहे. लोअर ऑर्बिटमधून कॅमेऱ्याचा पुरेपूर वापर करण्याची योजना आहे. चंद्रापासून ५० किलोमीटरच्या कक्षेत गेलो तर फोटो अजून चांगले मिळतील. अजून यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. ऑर्बिटरचे साडेसात वर्षांचे आयुष्य असल्यामुळे आम्हाला संधी आहे. ऑर्बिटरमध्ये हाय रेसोल्युशनचे उत्तम कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण चंद्रभूमीची माहिती मिळवता येईल असे सिवन यांनी सांगितले.

लँडरने आपले कार्य सुरु केले तर हे काम अधिक सोपे होईल. कारण सॉफ्ट लँडिंग झाले असते तर लँडरच्या आत असलेला सहा चाकी प्रग्यान रोव्हर बाहेर आला असता त्यातून चंद्रावरील माती, पाणी, बर्फ यासंबंधी आणखी उपयुक्त माहिती मिळू शकली असती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 5:03 pm

Web Title: viram lander orbiter isro chandrayaan 2 dmp 82
Next Stories
1 लुंगी नेसून ट्रक चालवला तर दोन हजार रुपयांचा दंड !
2 तुम्ही वाहन कसं चालवता यावर आता ठरणार तुमचा विम्याचा हप्ता!
3 धावांचा रतीब घालणारा विराट शाळेत होता ढ मुलगा, गणितात मिळाले होते *** मार्क
Just Now!
X