News Flash

Video : टेरेसवर टेनिस खेळत झाल्या होत्या व्हायरल, फेडररने दिलं सरप्राईज गिफ्ट

मुलींना भेटण्यासाठी फेडरर पोहचला थेट इटलीत

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. या लॉकडाउन काळात वेळ जावा यासाठी अनेकांनी विविध युक्त्या शोधून काढल्या. इटलीतल्या दोन मुलींनी वेळ घालवण्यासाठी घराच्या टेरेसवर जात टेनिस खेळत असतानाचा व्हिडीओ बनवला होता. १३ वर्षीय व्हिक्टोरिया आणि ११ वर्षीय कॅरोला यांचा हा अनोखा भन्नाट प्रयोग सोशल मीडियावर चांगलाच गाजला. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली. इतकच नव्हे तर ATP ने देखील या मुलींचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत त्यांचं कौतुक केलं होतं.

टेनिस जगताचा सम्राट अशी ओळख असलेल्या रॉजर फेडररने या दोन्ही मुलींना काही दिवसांपूर्वी एक सरप्राईज गिफ्ट दिलं. तो स्वतः या मुलींना भेटण्यासाठी इटलीत दाखल झाला होता. १० जुलैला फेडररने या मुलींना भेट देत त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

३८ वर्षीय फेडररने या मुलीचं कौतुक केलं. चाहत्यांना सरप्राईज देणं मला आवडतं, आणि टेनिसपटू म्हणून माझ्यासाठी हा खास क्षण असल्याचं फेडरर म्हणाला. दोन्ही मुलींच्या खास आग्रहास्तव फेडरर त्यांच्यासोबत टेनिसही खेळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 3:41 pm

Web Title: watch from the lockdown rooftop match that went viral to meeting roger federer psd 91
Next Stories
1 असा दिसतो ज्युनिअर पांड्या, हार्दिकने पोस्ट केला बाळाचा Cute फोटो
2 एका वर्षात ३०० पेक्षा अधिक चौकार, फक्त एकाच भारतीय खेळाडूला जमलाय हा विक्रम !
3 गौतम गंभीरचं कौतुकास्पद पाऊल, घेतली सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
Just Now!
X