पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र जवळजवळ स्पष्ट झालं आङे. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येत आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व जागांचे कल हाती आले आहेत. सध्या सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळतानाचे चित्र दिसत आहे. असं असलं तरी भाजपानेही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दमदार कामगिरी केल्याचं चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोशल नेटवर्किंगवर प्रतिक्रिया उमटू लागल्यात. त्यातच ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही ट्रोल केलं जात आहे.

७ मार्चला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताच मिथुन चक्रवर्ती यांनी आपण कोब्रा असल्याचा उल्लेख केला होता. आता पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ता मिळवता येणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी भाजपाचा हा कोब्रा भाजपालाच डसला की काय असं म्हणत मिथुनदा यांना ट्रोल केलं आहे.

१) निकाल पाहून

२) कधी घेणार ते शपथ?

३) पॅरडी अकाऊंटवरुन…

४) म्हतारपणी अपमान करुन घेतला

५) कोब्रा कुठं आहे?

६) कोब्राने भाजपाला खाल्लं

७) कोब्रा कुठेय?

८) कोणाला चावला कोब्रा बघा…

९) निकाल पाहून

१०) तेव्हा आणि आता

११) कोब्रा शोधा

नक्की काय म्हणाले होते मिथुन चक्रवर्ती

मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेल्या कोलकातातील ब्रिगेड मैदानातील व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी समर्थक जोरदार प्रतिसाद देत असताना मिथुन यांनी त्यांच्या चित्रपटातील संवाद म्हणून दाखवला. “आमी जोलधारो नोई, बेले बोराओ नोई, अमी एकता कोब्रा एक चोबोल एइ चोबी”. (घातक नसलेला साप मला समजू नका, मी कोब्रा आहे. कुणालाही एका डंखात मारू शकतो.)

२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. भाजपात प्रवेश करत मिथुन यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारण्यात आलं.