फेसबुक जगभरात सगळ्यात जास्त वापरली जाणारी सोशल मिडिया साईट आहे. आता हेच बघा ना या फेसबुकचे सर्वाधिक युजर्स हे तर भारतातच आहेत. दरदिवशी आपण या फेसबुकवर किती अॅक्टीव्हेट असतो. आपला अर्ध्याधिक वेळ तर फेसबुकवरच जाते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या अपडेट फेसबुकवर अनेक जण टाकत असतात. या फेसबुकवर किती मित्र मैत्रिणी बनतात. पण फेसबुकवर सतत अॅक्टीव्ह असणारा आपल्यातलाच एखादा जवळचा मित्र वारला तर त्याच्या फेसबुक अकाऊंटचे काय होते हा प्रश्न कधी आलाय का डोक्यात ?
फेसबुक युजर्सपैकी अनेक जणांचा अपघाती किंवा आजाराने मृत्यू होतो पण त्याचा पासवर्ड त्याच व्यक्तीला माहित असल्यामुळे याआधी अशा अनेक युजर्सचे फेसबुक अकाऊंट सुरूच राहायचे आणि त्यातल्या कित्येक जणांना ही व्यक्ती मृत पावली आहे हे समजायचे नाही. म्हणूनच फेसबुकने गेल्याचवर्षी ‘लिगसी पॉलिसी’ सुरू केली आहे. म्हणजे जर आपली जवळची फेसबुक अकाऊंट असलेली एखादी व्यक्ती मृत पावली तर त्याच्या जवळची व्यक्ती त्याचे अकाउंट वापरू शकते. अशी लिगसी कॉन्टॅक्ट युजर्स त्याव्यक्तीच्या वतीने त्यांच्या टाईमलाईनवर पोस्ट करू शकते. या व्यक्तीला मृत व्यक्तीचे पर्सनल मेसेज दिसत नाही. पण मृत व्यक्तीच्या फेसबुकवर आलेल्या फ्रेंड रिक्वेस्टना उत्तर देणे, त्याच्या टाईम लाईनवर पोस्ट टाकणे किंवा त्याचा कव्हर फोटो अपलोड करणे यासारखे गोष्टी मात्र तो करू शकतो.
त्यानंतर फेसबुकने अकाऊंट मेमोरियलाईज करण्याचा देखील पर्याय दिला आहे. जर एखादी व्यक्ती मृत पावल्याचा पुरावा फेसबुकला दिल्यास त्याचे अकाऊंट मेमोरियलाईज करता येते. त्यानंतर त्या व्यक्तीचे अकाऊंट कोणालाही दिसत नाही किंवा इव्हेट रिमांईडरमध्ये त्याचा वाढदिवसही दिसत नाही.