26 January 2021

News Flash

WhatsApp पॉलिसीला विरोध! आनंद महिंद्रांनीही डाउनलोड केलं Signal अ‍ॅप

WhatsApp चा विरोध सिग्नल अ‍ॅपच्या पथ्यावर, अ‍ॅप स्टोअरमध्येही ठरलं अव्वल

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीविरोधात युजर्सची नाराजी दिवसेंदिवस वाढतेय. जगभरातून व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीला होत असलेला विरोध सिग्नल अ‍ॅपच्या मात्र चांगलाच पथ्यावर पडला आहे. आता महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही सिग्नल अ‍ॅप डाउनलोड केलंय.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनीही काही दिवसांपूर्वी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही भारतीयांना सिग्नल अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं, आणि आता आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे सिग्नल अ‍ॅप डाउनलोड केल्याची माहिती दिली आहे. आनंद महिंद्रांनी ट्विटरद्वारे सिग्नल डाउनलोड केल्याची माहिती शेअर केल्यापासून त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. प्रायव्हसीबाबत चिंता वाटत असेल तर सोशल मीडियाचा वापरच करु नका, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्यात. तर, अनेक नेटकऱ्यांनी सिग्नल अ‍ॅपचं समर्थन करत महिंद्रांनी उचललेलं पाऊल योग्य असल्याचं म्हटलंय. याशिवाय अनेकांनी तुम्ही डाउनलोड केलेलं अ‍ॅप आम्हीही निश्चिंत होऊन डाउनलोड करु शकतो असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- Signal ची लॉटरी लागली! लोकप्रियता प्रचंड वाढली, एलन मस्कनंतर पेटीएम सीईओही म्हणाले ‘Signal वापरा’

आणखी वाचा- समजून घ्या : WhatsApp च्या नवीन धोरणांमुळे कोणती माहिती जाहीर होणार?

WhatsApp ला झटका, भारतातील टॉप फ्री अ‍ॅप बनलं Signal :
दरम्यान, सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली. यासोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला असून कॅप्शनमध्ये ‘बघा तुम्ही काय केलं?’, अशा आशयाचं ट्विट केलं आहे. भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँग काँग आणि स्विझर्लंड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड अ‍ॅप ठरलं आहे.

आणखी वाचा- Google वर दिसायला लागले WhatsApp चे प्रायव्हेट ग्रुप, सर्च करुन कोणीही होऊ शकतं जॉइन

काय आहे सिग्नलची खासियत :
सिग्नल अ‍ॅपद्ववारे तुमचा पर्सनल डेटा मागितला जात नाही किंवा स्टोअरही केला जात नाही. त्यामुळे हा डेटा कोणासोबत शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलवर फक्त तुमचा फोन नंबर स्टोअर केला जातो. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि जुने मेसेज आपोआप गायब होण्याचं फिचरही यामध्ये आहे. याशिवाय सिग्नलची खासियत म्हणजे यात ‘डेटा लिंक्ड टू यू’ (Data Linked to You) फिचरही दिलं आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमची चॅटिंग पूर्णतः सुरक्षित असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 11:32 am

Web Title: whatsapp privacy policy row anand mahindra installs signal app sas 89
Next Stories
1 Signal ची लॉटरी लागली! लोकप्रियता प्रचंड वाढली, एलन मस्कनंतर पेटीएम सीईओही म्हणाले ‘Signal वापरा’
2 “सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी अश्विनला सरळ उभंही राहता येत नव्हतं”, पत्नीने केली इमोशनल पोस्ट
3 पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केलं किळसवाणं कृत्य, व्हिडिओ होतोय व्हायरल
Just Now!
X