News Flash

Photos: लिंबू कलरच्या साडीतील ‘ती’ महिला अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत

लिंबू कलरची साडी आणि भुरळ पाडणारं सौंदर्य यांमुळे रीना यांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते.

रीना द्विवेदी

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाशझोतात आलेली महिला अधिकारी रीना द्विवेदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लिंबू कलरची साडी आणि भुरळ पाडणारं सौंदर्य यांमुळे रीना यांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते. नेटकऱ्यांनी त्यांनी ‘मिस जयपूर’चाही किताब दिला होता. आता विधानसभा निवडणुकीनिमित्त त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रकाशझोतात आल्या आहेत. रीना यांची निवडणूक ड्युटी ज्याठिकाणी लागली आहे, तिथे मतदारांची रांगच लागली आहे.

रीना यांची ड्युटी लखनऊमधील कृष्णा नगरच्या महानगर इंटर कॉलेजमध्ये लागली आहे. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. रीना यांच्या मतदार केंद्रावर मतदारांची रांग लागली होती. इतकंच नव्हे तर काहीजण त्यांच्यासोबत सेल्फीसुद्धा काढत होते.

काही महिन्यांपूर्वी रीना यांचा ‘टिक-टॉक’ व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. रीना सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. सोशल मीडिया सेन्सेशन झालेल्या रीना यांच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 6:35 pm

Web Title: yellow saree officer reena dwivedi polling agent is trending once again ssv 92
Next Stories
1 VIDEO: ३५ फुटांवरुन पडला तरी सुखरुप बचावला; काळजाचा धोका चुकवणारे CCTV फुटेज
2 धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तरुणाला भूतानमध्ये अटक
3 ‘तेरा इमोशनल अत्याचार’ गाण्यामधील हा अभिनेता कोण आहे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Just Now!
X