News Flash

पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या पेनाची किंमत लाखांच्या घरात?

पेनांची निब ही सोन्यापासून बनवली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या पेनाची सध्या सोशल मीडियावर खमंग चर्चा सुरू आहे. अर्थात देशाचे पंतप्रधान आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडे जगातल्या सर्वात बेस्टच वस्तू असतील, यात तिळमात्र शंका नाही. तेव्हा ते वापरत असलेल्या वस्तू कोणत्या? त्या कोणत्या ब्रँडच्या आहेत? त्यांची किंमत काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य माणसांना असेलच. तर ते वापरत असलेल्या पेनाच्या किंमतीबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे. ते वापरत असलेल्या पेनाची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. या पेनाची किंमत जवळपास लाखांच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : धमक्यांना भीक न घालता ‘त्या’ मुस्लिम तरूणाने केला समलैंगिक विवाह

मोदींकडे अनेक ब्रँडचे पेन आहेत. त्यातून Mont Blanc माँट ब्लन्क हा त्यांचा सगळ्यात आवडता ब्रँड आहे. या कंपनीच्या पेनांची किंमतच काही हजारोंच्या घरात आहे. या पेनांची भारतीय बाजारातल्या किंमती पाहिल्या तर त्या २२ हजार, ४५ हजार, ५६ हजार, ६३ हजार रुपये अशा आहेत. काहींच्या किंमती या लाखोंच्या घरात आहेत. माँट ब्लन्क ही जर्मन कंपनी असून ती महागड्या आणि लक्झरी वस्तूंची निर्मिती करते. घड्याळ, पेन, चामड्याच्या वस्तू, दागिने अशा वस्तू प्रामुख्याने तयार केल्या जातात. माऊंट ब्लन्क या पर्वतावरून या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं आहे. यातल्या काही पेनांच्या निबवर ‘4810’ हा आकडा असतोच. पर्वताची एकूण उंची हा आकडा दर्शवतो. यातल्या काही पेनांची निब ही सोन्यापासून बनवली आहे. म्हणूनच याची किंमत जास्त असल्याचे म्हटले जाते.

(ट्रेडिंग सेक्शनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय यावरून केलेल्या असतात. त्याची सत्यता पडताळून बघू शकत नाही.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:23 pm

Web Title: you will be shocked to know price of pen which is prime minister narendra modi use
Next Stories
1 डासांवर गूगल आणि मायक्रोसॉफ्ट शोधणार रामबाण इलाज
2 म्हणून ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले
3 धमक्यांना भीक न घालता ‘त्या’ मुस्लिम तरूणाने केला समलैंगिक विवाह
Just Now!
X