Video Viral: एखादा साप समोर दिसला की भल्याभल्यांना घाम फुटतो. साप किती धोकादायक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. फक्त माणसांनाच नाही तर मोठमोठ्या प्राण्यांनाही तो आपल्या एका दंशाने मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात त्याच्यापासून चार हात लांब राहणेच शहापणाचे ठरते. अशातच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक साप घराच्या अंगणात आल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियाचे जग विविध व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्यात अगदी विविध कलाकृतींपासून ते प्राण्यांपर्यंत असे अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. यावर सापांचेही अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराच्या अंगणात साप आला असून यावेळी त्याच अंगात घरातील एक वृद्ध महिला फिरत आहे. यावेळी ज्या ठिकाणी साप आहे त्याच ठिकाणी ती महिला काहीतरी काम करण्यासाठी जाते, यावेळी नकळत तिचा पाय त्या सापावर पडतो, त्यामुळे महिलेची साडी साप त्याच्या तोंडात पकडतो. इतक्यात महिला सावध होते आणि सापाला पाहून घरामध्ये निघून जाते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TouchFactsTamil नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय, “बापरे, नशीब साप साडीला चावला” तर आणखी एक म्हणतो, “अंगावर काटा आला”
