आयुष्याविषयी आपल्या सरधोपट कल्पना असतात. जन्माला आल्यापासून ते म्हातारपणापर्यंत आपलं सगळं काही ठरलेलं असतं. शाळेत जायचं, चांगले मार्क मिळवायचे शिक्षण पूर्ण करायचं, मग नोकरी लग्न वगेंरे आणि मग संसारातून निवृत्त होऊन आरामाचे दिवस काढायचे.

पण तुम्हाला तुमच्या म्हातारपणी एखादं अॅडव्हेंचर स्पोर्टमध्ये भाग घ्यायला सांगितलं तर तुमची काय प्रतिक्रिया होईल? या सगळ्याला ‘नको रे बाबा’ म्हणणाऱ्यांची जाॅक रेनल्ड्सची ओळख करून द्यायला हवी.

जॅक फक्त १०५ वर्षाचे आहेत. आणि याही वयात त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्याकडे बघून कळणार नाही की हे १०५ वर्षांचे आहेत म्हणून. दुसऱ्यातिसऱ्या कोणालाही एवढं दीर्घायपष्य लाभलं असतं तर तो शातंपणे पेन्शनचे पैसे घेत शांत बसला असता. पण जॅक रेनल्ड्सना अशा निरूद्योगी गोष्टींमध्ये रस नाही. त्यांनी ‘काहीतरी तूफानी’ करायचं ठरवलं आणि वयाच्या १०५ व्या वर्षी त्यांनी चक्क रोलरकोस्टरची राईड घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोलरकोस्टर हे तसं भयानक प्रकरण. प्रचंड वेगामध्ये जाणाऱ्या आणि त्याच वेगात वर-खाली जाणाऱ्या रूळांवरून भरधाव रोलरकोस्टर हे काही नाजूक हृदय असणाऱ्यांसाठी नक्कीच नाही. तुम्ही कधी रोलरकोस्टरवर बसला असाल तर त्यामध्ये बसण्याआधी दिले जाणारे सावधानीचे इशारे तुम्ही वाचले असतीलच. पण जॅक यांनी हे आव्हान लीलया पेललं. इंग्लंडमधल्या याॅर्कशर इथल्या रोलर कोस्टरवर ते बसले. आणि रोलरकोस्टरवर बसणारा जगातला सर्वात जास्त वयाचा माणूस म्हणून जॅक रेनल्ड्स यांचं नाव गिनिज बुक आॅप वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय.

पण मजेची बाब म्हणजे हा त्यांचा दुसरा जागतिक विक्रम आहे. याआधी आपल्या शरीरावर टॅटू काढून घेणारा सगळ्यात वयस्कर माणूस म्हणून जॅकच्या नावावर याआधीच एका विक्रमाची नोंद आहे.

जगात हौशी लोकांची मुळीच कमतरता नाही.

[jwplayer ljYLQFs9]