आपल्याला लॉटरी लागली तर..? किती बरं होईल ना! आयुष्यभर नोकरी करण्याची गरजच लागणार नाही. पुढच्या पिढ्या बसून खातील. असे कितीतरी स्वप्नांचे मनोरे आपण रचत असतो. पण लॉटरी काही लागत नाही. पण काही जणांचं नशीब एवढं चांगलं असतं की ज्या गोष्टीची ते स्वप्नातही कल्पना करत नाही अशी गोष्ट त्यांच्या सोबत घडते. कॅलिफोर्नियामधल्या रोझा नावाच्या १९ वर्षीय तरुणीसोबत असाच एक अनपेक्षित प्रकार घडला. तिने सहजच एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं. आपल्याला काही लॉटरी लागणार नाही असं तिला वाटलं. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिला साडेपाच लाख डॉलरची लॉटरी लागली होती. ही रक्कम साधरण साडे तीन कोटींच्या आसपास होती. तिला यावर विश्वासच बसत नव्हता. कॉलेजला जाणाऱ्या रोझाला ही किंमत समजल्यावर तिला रडूच येऊ लागलं. या पैशांचं करायचं काय हेच तिला समजत नव्हतं.

पुन्हा एकदा नशीब आजमवण्यासाठी तिने आणखी एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्यावेळीही ती लॉटरी जिंकली. यावेळी ती जवळपास दीड कोटींची लॉटरी जिंकली. हा तिच्यासाठी दुसरा मोठा धक्का होता. तिने एका आठवड्यात लॉटरी जिंकून जवळपास साडेचार कोटी कमावले.