Premium

४९० कोटींचं लग्न लागताच आता नवरदेवाला २५ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होणार? पूर्ण प्रकरण जाणून व्हाल थक्क

Crime News: नवरीच्या वडिलांकडे मर्सिडीज-बेंझ डीलरशिप आहेत. तिच्या भव्य लग्नासाठी, तिने डायर गाऊन घातला होता, त्याची किंमत अंदाजे ५६ दशलक्ष डॉलर होती. आणि आता या शाही विवाहानंतर..

490 crores Wedding Of The Centaury Bride Wears 56 Million Dollars Dress And Groom Shot Police Get 25 years Life Punishment
४९० कोटींचं लग्न, ५६ मिलियन डॉलरचा नवरीचा ड्रेस आणि नवरदेवाला जन्मठेप? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Groom Faces 25 Years Jail After Wealthy Wedding: मॅडलेन ब्रॉकवे आणि जेकब लाग्रोन यांच्या भव्य लग्नाने या जोडप्याला रातोरात जगप्रसिद्ध केलं, परंतु आता या नवरदेवाला लग्नानंतर लगेचच तब्बल २५ वर्षांसाठी तुरंगवास भोगावा लागणार असल्याची चर्चा आहे. फ्लोरिडा येथील कार डीलरशिप समूहाची वारसदार, ब्रॉकवे,तिच्या भव्य लग्नामुळे सध्या जगभरात चर्चेत आहे. पॅरिसमध्‍ये ‘वेडिंग ऑफ द सेन्‍चुरी’ अशा नावाने हा ४९० कोटीचा लग्नसोहळा पार पडला. पाच दिवसीय सोहळ्यात व्हर्साय पॅलेसमध्‍ये रात्रभर मुक्काम आणि मरून ५ च्‍या खाजगी कॉन्सर्टचा सुद्धा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र या बहुचर्चित लग्नानंतर २७ वर्षीय ब्रॉकवेने आता तिचे इंस्टाग्राम आणि टिकटॉक खाजगी केले आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, तिचा २९ वर्षीय पती जेकब लाग्रों याला पोलिस अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याबद्दल संभाव्य जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागत आहे. त्याच्यावर १४ मार्च रोजी टेक्सासमध्ये तीन पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जेव्हा लाग्रोंने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा वेस्टवर्थ व्हिलेज पोलिस अधिकारी ऑन ड्युटी होते. टेक्सासमध्ये सरकारी सेवकावर हल्ला हा प्रथम श्रेणीचा गुन्हा आहे. आरोपानुसार, लाग्रोंने अधिकार्‍यांना “जाणूनबुजून शारीरिक दुखापतीची धमकी दिली होती आणि हल्ला करताना बंदूक वापरली होती.

हे ही वाचा<< ‘आयुष्यात काही घडतच नाहीये’ वाटत असेल तर भेळपुरीवाल्या काकांचा ‘हा’ Savage Video बघाच! हसून व्हाल हैराण

लाग्रों ३० नोव्हेंबर रोजी फोर्ट वर्थ येथील टारंट काउंटी कोर्टहाऊसमध्ये हजर झाला होता. या प्रकरणी निकाल येणे अजून बाकी आहे त्यात तो दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्याची पत्नी मॅडलिन ब्रॉकवे न्यायालयीन कामकाजात सहभागी झाली नव्हती.

मॅडलिन ही बॉब ब्रॉकवे यांची मुलगी आहे, ज्यांच्याकडे फ्लोरिडामध्ये मर्सिडीज-बेंझ डीलरशिप आहेत. तिच्या भव्य लग्नासाठी, तिने डायर गाऊन घातला होता, त्याची किंमत अंदाजे ५६ दशलक्ष डॉलर होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 490 crores wedding of the centaury bride wears 56 million dollars dress and groom shot police get 25 years life punishment svs

First published on: 08-12-2023 at 12:27 IST
Next Story
VIDEO : मेट्रोचं दार बंद होणार अन् चोराने डाव साधला! क्षणात हिसकावला मोबाईल; बिचारा तरुण पाहातच राहिला