‘प्रेम’… अडीच अक्षरी शब्द. पण या शब्दात मोठं सामर्थ्य आहे. प्रेमात असण्यासारखा दुसरा सुंदर अनुभव आयुष्यात नाही, प्रिय व्यक्तीवर निख्खळ प्रेम करणं म्हणजे एका अर्थानं उपासना करणं असंही प्रेमाचं वर्णन कथा, कवितेतून आपण ऐकत आलोय. पण एका विकसित देशातील महिलांना मात्र प्रेमबीम करणं म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय वाटतो. प्रेम करायला आपल्याकडे वेळचं नाही असं त्या महिला सांगत आहेत.
Video : भले भले हिरो ‘या’ लिटिल मास्टरच्या डान्स समोर पडतील फिके
‘कोकोलोनी डॉट जेपी’ या ऑनलाईन डेटिंग वेबसाईटनं सर्व्हेक्षण केलं त्यातून ही आश्चर्यकारक बाब समोर आली. ‘आयएएनएस’ वृत्तसंस्थेच्या मते ६० टक्के जपानी महिला अशा आहेत ज्यांना प्रेम करायला मुळीच वेळ नाही आहे. खरंतर जपानी महिल्यांच्या सुंदरतेचं आणि नाजूकपणाचं वर्णन आपण अनेकदा वाचत आलोय, पण या महिलांना मात्र प्रेमात काडीमात्र रस नाही आणि याचं कारण आहे त्यांच्या कामाची पद्धत. जपानमध्ये कामाचे तास जास्त आहे, अनेकांना कार्यालयात जास्त वेळ थांबावं लागतं. कामाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण आणि कामाचे तास यामुळे महिला दिवसाच्या अखेरीस पूर्णपणे थकून जातात. काम संपल्यानंतर जो काही वेळ मिळतो तो प्रियकरासोबत घालवण्यापेक्षा आराम करण्याकडे त्यांचा जास्त कल आहे असंही या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. दर चारपैकी १ महिलनेनं हेच उत्तर दिलं आहे.
सध्या जपानी महिलांचं प्रेमाविषयी हे मत असलं तरी ८० च्या दशकातील महिलांचे विचार याहून उलट होते. त्यावेळी विशीच्या आसपासच्या जवळपास ६० टक्के महिल्या या विवाहबंधनात अडकल्या होत्या.