मुलं लहान असोत वा मोठी आपल्या आईला भेटण्याची त्यांना अनोखी ओढ असते, आईला भेटण्यासाठी मुलं काहीही करायला तयार असतात. पण सध्या अशी एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका १० वर्षाच्या मुलाने आपल्या आईला भेटण्यासाठी चक्क एका कारची चोरी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला ती व्यवस्थित चालवायला येत नसतानाही त्याने ती कार भरधाव वेगाने हायवेवरुन पळवळी. जे पाहून पोलीसांना देखील धक्का बसला होता. दरम्यान पोलिसांनी मुलाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील मिशीगन येथील आहे. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगा जी कार चालवत होते ती त्याने चोरी केली होती. शिवाय त्या मुलाने पोलिसांना सांगितलं की, आईला भेटायला जाण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता म्हणून त्याने ही कार चोरली. या कारची सुरुवातीची किमंत २० लाख इतकी आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

हेही पाहा- बॅंकेतच महिलेच्या अंगात आली देवी? सरकारला दिला शाप, केस मोकळे सोडून नाचतानाचा Video व्हायरल

या घटनेबाबत, मिशीगन राज्य पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांना माहिती मिळाली होती की एक अल्पवयीन मुलगा हायवेवर कार चालवत आहे. या मुलाचा एका पथकाने पाठलाग केला असता त्याने कारचा वेग वाढवला. मात्र, काही अंतरावर तो जाताच पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत या मुलाने कार चोरली होती आणि तो त्याच्या आईला भेटायला जात असल्याचं समोर आलं.

घटनेतील मुलाची उंची ५ फुटांपेक्षा कमी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तर तो मिशीगन येथील डेट्रॉयट येथे त्याच्या आईला भेटायला जात होता. त्याला थांबवल्यानंतर त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांला बालसुधारगृहात पाठवलं आणि नंतर सोडून दिलं. व्हायरल व्हिडीओमध्ये हा मुलगा कशीही कार चालवताना दिसत आहे. यावेळी त्याच्या मागून पोलिसांची गाडी जात असल्याचंही दिसत आहे. मुलगा कधी हायवेच्या डावीकडे जातो तर कधी उजवीकडे गाडी नेत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.