लग्नांनंतरही दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. आपल्याला आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. अशीच एक घटना कानपुर शहरात घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील स्त्री-पुरुष हे दोघेही भाजपा पक्षाचे कार्यकर्ता आहेत.

कानपूरमध्ये एका भाजप नेत्याला पार्टीच्या महिलेसोबत कारमध्ये रंगेहात पकडण्यात आले. दोघांनाही त्यांच्या कुटुंबीयांनी पकडले. यानंतर या नेत्याला पत्नी आणि सासूने रस्त्याच्या मधोमध चप्पलने मारहाण केली. त्याचवेळी महिलेला तिच्या व्यावसायिक पतीने मारहाण केली. त्याचवेळी महिलेला तिच्या व्यावसायिक पतीने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा

या घटनेची माहिती मिळताच काही वेळातच पोलीस तेथे हजार झाले आणि ते सर्वांना जुही पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या प्रकरणी भाजप नेत्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, या भाजपा नेत्यामुळे त्याच्या सोसायटीतील लोकही हैराण होते. अनेकांनी त्याच्या कृत्याची ग्वाही पोलिसांसमोर दिली आहे.

IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअ‍ॅक्शन

बाबूपुरवाचे मोहित सोनकर हे भाजपचे कानपूर-बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. मोहितच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कुटुंबाला माहिती होती, परंतु त्यांना मोहीत यांना रंगेहात पकडायचे होते. शनिवारी रात्री मोहित हा आनंदपुरी सोसायटीच्या कॅम्पसमध्ये भाजपच्या एका महिला नेत्यासोबत कारमध्ये होता. घरच्यांना याची माहिती मिळाली.

पत्नी मोनी सोनकर आणि सासूसह सासरच्यांनी त्यांना कारमध्ये रंगेहात पकडले. मोहितला पत्नी आणि सासरच्या लोकांनी रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केली. मोहित पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला पकडण्यात आले. भाजपा नेत्याच्या विरोधात त्याची पत्नी आणि महिलेच्या व्यावसायिक पतीने जुही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एसीपी बाबूपुरवा आलोक सिंग यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल झाली आहे. आरोपी मोहितसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहितला दोन मुलेही आहेत. तो कारमध्ये ज्या महिलेसह होता ती ४६ वर्षांची आहे आणि तो स्वतः ३२ वर्षांचा आहे. तो आपल्याहून १५ वर्षांनी मोठ्या महिलेसह प्रेमसंबंधात होता. या मुद्द्यावरून घरात दररोज वाद व्हायचा. यावेळी मोहित आपली पत्नी आणि मुलांसोबतचे संबंध तोडणार असल्याचेही बोलत होता.

IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी

नवऱ्याचे दुसऱ्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध असल्याने मोहितची पत्नी चिंतेत असायची. मोहितवर असाही आरोप करण्यात आला आहे की, तो आपल्या पत्नीला रोज मारहाण करायचा. तसेच तो स्फोट घेण्याच्या तयारीत होता. महिलेचा व्यावसायिक पतीही पत्नीच्या अवैध संबंधांमुळे त्रस्त होता. यावरून दोघांमध्ये घरगुती वाद झाला होता. यानंतर भाजप नेत्याची पत्नी आणि महिलेचा पती एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांनी कुटुंबासोबत मिळून प्लॅनिंग केले आणि दोघांनाही रंगेहात पकडले.